Lok Sabha Election 2024 : मतदार जनजागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वाक्षरी मोहीम

Lok Sabha Election 2024 : राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जनजागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग: मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

93
Lok Sabha Election 2024 : मतदार जनजागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वाक्षरी मोहीम
Lok Sabha Election 2024 : मतदार जनजागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वाक्षरी मोहीम

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयाच्या तर्फे विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- ST Administration: सप्तश्रृंगगडावर चैत्रोत्सवानिमित्त सुरक्षित प्रवासासाठी जादा बससेवेचे नियोजन)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani), मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव (Sanjay Yadav), मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १८१- माहिम विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वाक्षरी मोहीम उपक्रमास राज्यपाल रमेश बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर सही करून मतदारांनी दि.२० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Narayan Rane On Uddhav Thackeray : अडीच वर्षात दोनच दिवस मंत्रालयात गेले; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणूकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने (Systematic Voters Education & Electoral Participation) समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. (Lok Sabha Election 2024)

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आदींसह विविध मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Salman Khan: मुख्यमंत्री शिंदेंनी केला सलमान खानला फोन; सुरक्षेत केली वाढ)

याप्रसंगी माहीम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी या विशेष मोहीमेसाठी पुढाकार घेतला. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.