Narayan Rane On Uddhav Thackeray : अडीच वर्षात दोनच दिवस मंत्रालयात गेले; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. पाच किलो धान्य कुणाला दिले का ? उलट केंद्र सरकारकडून कोरोना काळात औषधासाठी पैसे आले त्यात 15 टक्के कमिशन खाल्ले, त्याची चौकशी सुरू आहे. याला जवळ घेऊ नये, मी नाय सोडणार, असे नारायण राणे म्हणाले.

84
Narayan Rane On Uddhav Thackeray : अडीच वर्षात दोनच दिवस मंत्रालयात गेले; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Narayan Rane On Uddhav Thackeray : अडीच वर्षात दोनच दिवस मंत्रालयात गेले; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

उद्धव ठाकरे यांना काय कळतं, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणजे फुसका बार, अडीच वर्षांत दोन दिवस मंत्रालयात गेले. मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. जो माणूस मंत्रालयात जाऊ शकत नाही, त्यांनी लोकांच्या हिताचे कोणते काम केले, अशी टीका भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. (Narayan Rane On Uddhav Thackeray)

रत्नागिरी (Ratnagiri) – सिंधुदुर्ग (Sindhudurg) लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election 2024) महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजप नेते नारायण राणे हे तिकीटासाठी इच्छुक आहेत. यामुळे राणेंनी महाविकास आघाडीला लक्ष केले आहे.

(हेही वाचा – Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका!)

कोरोना काळात 15 टक्के कमिशन खाल्ले

नारायण राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. पाच किलो धान्य कुणाला दिले का ? उलट केंद्र सरकारकडून कोरोना काळात औषधासाठी पैसे आले त्यात 15 टक्के कमिशन खाल्ले, त्याची चौकशी सुरू आहे. याला जवळ घेऊ नये, मी नाय सोडणार. विद्यमान खासदार विनायक राऊत 5 वर्षांत 57 टक्के खासदार निधी खर्च करू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांना चागलं बोलता येत नाही. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले, पण उद्धव ठाकरे यांच्यासारखी भाषा कोणी बोलले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व, मराठी माणूस यांच्याशी गद्दारी केव्हाही केली नाही

या वेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करतांना दहशतवाद्यांना सुपारी देणारा, कमिशन खाणारा, हिंदुत्वाशी गद्दारी करणारा, अशी सडकून टीका केली आहे. (Narayan Rane On Uddhav Thackeray)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.