Iran-Israel attack: इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी, जी-७ नेत्यांची बैठक होणार

135
Iran-Israel attack: इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी, जी-७ नेत्यांची बैठक होणार

इराण आणि इस्रायल देशांमध्ये असलेल्या तणावग्रस्त वातावरणादरम्यान इराणने रविवारी, (१४ एप्रिल) पहाटे इस्रायलवर थेट हल्ला केला. याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंच्या नेतृत्वाखालील देशांनी त्यांनी ९९ टक्के क्षेपणास्त्रे परतवून लावल्याचा दावा केला आहे.  (Iran-Israel attack)

इस्त्रायलने इराणकडून डागण्यात आलेले १७०ड्रोन, ३० पेक्षा जास्त क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १२० पेक्षा जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत आणि कमीतकमी जीवितहानी झाली आहे, असेही म्हटले आहे.

(हेही वाचा –Narayan Rane On Uddhav Thackeray : अडीच वर्षात दोनच दिवस मंत्रालयात गेले; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका )

इस्रायलने इराणच्या हल्ल्याचा निषेध करण्याची आणि इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची विनंती केल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची रविवारी बैठक होणार आहे. दरम्यान, याबाबत चर्चा करण्यासाठी जी-७ गटातील नेते रविवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.