Maratha Reservation: मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही; शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी

आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गाअंतर्गत नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू झाले आहे. हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

120
Maratha Reservation: मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही; शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी
Maratha Reservation: मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही; शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी

विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोमवार, २६ फेब्रुवारपासून हे आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे या पुढील काळात निघणाऱ्या नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू राहणार आहे.

शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी
विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. यासंदर्भात शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : ‘निर्दयी क्रिकेट म्हणजे नेमकं काय?’ असा प्रश्न बेन स्टोक्सने का विचारला? )

नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के जागा आरक्षित
आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गाअंतर्गत नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू झाले आहे. हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. सध्या राज्यात आधीपासूनच सुरू असलेल्या शासकीय नोकरभरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल, मात्र २६ फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के जागा आरक्षित असणार आहेत.

कारवाईची तीव्र मोहीम
राज्य सरकारने एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणारे मनोज जरांगे यांच्यासह राज्यभरातील आंदोलकांवर कारवाईची मोहीम तीव्र करून गुन्हे दाखल केले आहेत. जरांगेंची एसआयटी चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. सोमवार, २६ फेब्रुवारीपासून या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.