Veer Savarkar : वीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त संभाजीनगर येथे स्वराविष्कार कार्यक्रम

119
Veer Savarkar : वीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त संभाजीनगर येथे स्वराविष्कार कार्यक्रम
Veer Savarkar : वीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त संभाजीनगर येथे स्वराविष्कार कार्यक्रम

26 फेब्रुवारी या स्वा. सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त “अनादि मी..अनंत मी” हा ‘स्वराविष्कार’ म्हणजेच स्वा. सावरकरांच्या असीम प्रतिभेतून साकारलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील ‘मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह’ येथे संपन्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रम॔ंडळ छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर कलामंच माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. (Veer Savarkar)

“संगीतरूप स्मरण” या स॔कल्पनेतून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रकल्प प्रमुख विवेक घाणेकर, स॔कल्पना प्रमुख व निवेदिका प्रा. स्नेहल पाठक साहित्यिक मंगलाताई वैष्णव व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

(हेही वाचा – Shiv Sena : गोरेगावमध्ये उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का; वायकर, प्रभू यांच्या जवळचे सहकारी शिवसेनेत)

या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पाहुणे प्रा. उत्तम काळवणे, प्रा. अभिजीत धर्माधिकारी, प्रा. विजय रामदासी, सौ. अमृता पालोदकर, सौ. अलका भाले, सौ. स॔ध्या स्नेही, तसेच जालना येथील कुलकर्णी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सावरकरांच्या अनेक आठवणींना उजाळा

सर्व प्रथम संस्थेचे अध्यक्ष भाऊ सुरडकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व उपक्रमांची माहिती दिली. तसेच  विवेकजी घाणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर कलामंच माजलगाव यांच्या ग्रुपने सावरकर लिखीत अजरामर गीतांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. स्नेहलताई पाठक यांनी त्यांच्या सुंदर अशा शैलीत केले. साहित्यिक, माहितीपूर्ण व सावरकरांच्या अनेक आठवणी सांगत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

सावरकरांच्या गीतांचे सादरीकरण

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहलेल्या आरतीने सुरुवात केली. त्यानंतर पोवाडा, फटका, गझल या सावरकरांच्या साहित्यातील अनेक वेगवेगळे त्यांच्या माहितीपूर्ण विवेचनातून सादर करण्यात आले. त्यानंतर अतिशय उत्स्फुर्तपणे सावरकर यांचे अजरामर गीत जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला, अनादि मी अन॔त मी, प्रभो शिवाजी राजा यांचे सादरीकरण स॔जय कुलकर्णी, श्रीराम देशपांडे, लक्ष्मीप्रसाद पटवारी, कुणाल कुलकर्णी व इतर सहभागी कलाकार यांनी केले.

अतिशय भारावलेल्या वातावरणात या कार्यक्रमाची सांगता ही ” हे अधम रक्त र॔जिते सुजण पुजिते श्री स्वतंत्रते .. जयोस्तुते ” या गीताने आदरांजली वाहून केली. या कार्यक्रमास खास उपस्थित शहरातील प्रसिद्ध संगीततज्ञ विजय देशमुख सर यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सृष्टी सराफ यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन डोमाले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकाऱी भाऊ सुरडकर सर, किरण सराफ, सुभाष कुमावत, विजय जहागीरदार यांनी परिश्रम घेतले. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.