Lok Sabha Elections : काँग्रेसला महिला द्वेष अडचणीत आणणार

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना राणावत यांना भाजपाने तिकीट दिले. कंगना यांना दिलेली उमेदवारी आणि मंडी या शब्दांचा चुकीचा शब्द प्रयोग असलेली पोस्ट काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर टाकली.

114
Lok Sabha Elections : काँग्रेसला महिला द्वेष अडचणीत आणणार

महिलांचा सन्मान करण्यात अग्रेसर असल्याचे दाखवत काँग्रेसने नेहमीच महिलांना कमी महत्व दिले आहे. याचीच प्रचिती काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर भाजपाच्या लोकसभा उमेदवार तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात केलेल्या पोस्ट वरून येते. याच पोस्टची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर काँग्रेस आणि भाजपा मात्र सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करण्यात मग्न आहेत. काँग्रेसच्या या महिला विरोधी धोरणामुळे पक्षाला येत्या निवडणूकीत चांगलीच चपराक बसणार असल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha Elections)

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना राणावत यांना भाजपाने तिकीट दिले. कंगना यांना दिलेली उमेदवारी आणि मंडी या शब्दांचा चुकीचा शब्द प्रयोग असलेली पोस्ट काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर टाकली. त्यावर मोठा राडा काँग्रेस आणि भाजपामध्ये झाला आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या किसान आघाडीच्या एका नेत्यानेदेखील कंगना राणावत यांच्यावर असंसदीय भाषेत टीका केली आहे. त्यावरून देशातील महिला खासदार, नेत्यांनी काँग्रेस नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना घेरण्याची तयारी केली आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Prakash Ambedkar : वंचितचा मविआला शेवटचा इशारा; प्रकाश आंबेडकर म्हणाले, चळवळीला संपवण्याचा प्रयत्न)

समस्त मंडीवासीयांचा अपमान – कंगना

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपावर विविध विषयांवर जोरदार प्रहार केला. विविध टीव्ही चॅनलच्या लाइव्ह शोमध्ये सुप्रिया श्रीनेत या काँग्रेसचे विचार परखडपणे मांडतात, भाजपावर जहरी टीका करतात. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या एक्स हँडलवरून दुसऱ्या कोणीतरी ती पोस्ट टाकल्याचे सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले आहे. ती पोस्ट नंतर त्यांनी डिलीट केल्याचे सांगितले. कुणाही महिलेवर त्यांनी आतापर्यंत टीका केली नाही आणि भविष्यात करणार नाही. यावरून भाजपाच्या महिला नेत्यांनी सुप्रिया श्रीनेत यांच्यावर आगपाखड सुरू केली आहे. सुप्रिया पॅरोटी नावाचा अकाउंट सुरू आहे. त्यावरून ही पोस्ट टाकली गेली. कुणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी मी कधीही करणार नाही. महिलांच्या विरोधात मी आपत्तीजनक शब्दांचा प्रयोग करू शकत नाही, असे सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले, तर विचारधारेच्या विरोधातील लढाई सुरू राहील, असा ठाम विश्वास सुप्रिया श्रीनेत यांनी व्यक्त केला आहे. (Lok Sabha Elections)

विषयावरून कंगना राणावत यांनीदेखील तीव्र आपत्ती व्यक्त केली. त्यांनी मंडी ही काशी असल्याचे सांगत हा समस्त मंडीवासीयांचा अपमान असल्याचे सांगितले. कंगना राणावत यांनी त्या अभिनेत्री आहेत. कुठलाही व्यवसाय असो टिचर, अभिनेत्री, पत्रकार, राजनेता असो की, सेक्स वर्कर असो त्या महिलेचा अपमान करणे चुकीचे आहे. मंडी ही छोटी काशी आहे. मंडीवासीयांना या टीकेने मोठा त्रास झाला. या विषयावर तुम्ही महिला आयोगाकडे जाणार का, असे पत्रकारांनी विचारले असता, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारल्यानंतर तक्रार करण्यात येईल, असे कंगना राणावत यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.