Lok Sabha Election 2024 :…Vijay Shivtare यांच्यावर केव्हा होणार कारवाई; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले

195

बारामती लोकसभा मतदार संघातील (Lok Sabha Election 2024)  पेच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्यामुळे वाढला आहे. या ठिकाणी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले असताना अचानकपणे विजय शिवतारे यांनी या ठिकाणाहून निवडणुकीत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेकदा सांगूनही शिवतारे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे आता शिंदे गट शिवतारे यांच्यावर कारवाई करण्याच्या निर्णयापर्यंत आले आहे, मात्र जोवर शिवतारे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरत नाहीत, तोवर ही कारवाई करण्यात येणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.

(हेही वाचा Arvind Kejriwal यांचा ‘तो’ आदेश निघाला खोटा; भाजपाची आपच्या मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी)

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, हि लोकशाही आहे. जर काही कार्यकर्त्यांना अपक्ष लढायचे (Lok Sabha Election 2024) असेल तर तो लढू शकतो. आतापर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेला नाही. जेव्हा हे लोक अपक्ष अर्ज भरतील तेव्हा शिंदे त्यांच्याबाबक कठोर भूमिका घेतली, असे शिरसाट म्हणाले. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्यावर छेडले असता त्यांना जागा सुटत नव्हती. शेवटी ते महायुतीच्या सरकारमध्ये येत आहेत. राष्ट्रवादी पक्ष असो की कोणताही पक्ष असो ते आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये येत आहेत, हे स्वागतार्ह आहे, असे शिरसाट म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.