Arvind Kejriwal यांचा ‘तो’ आदेश निघाला खोटा; भाजपाची आपच्या मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

ईडीच्या कस्टडीतून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) कुठलाही आदेश काढू शकत नाहीत. अशी कुठलीही तरतूद नाही.

167

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या अटकेत आहेत. त्यांनी येथून जारी केलेल्या कथित ‘आदेशा’वरून आता वाद निर्माण झाला आहे. हा आदेश खोटा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना आणि ईडीकडे केली आहे. भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यानी ही तक्रार केली आहे.

(हेही वाचा Arvind Kejriwal : केजरीवाल यांचे पैशाच्या बदल्यात दहशतवाद्याला सोडण्याचे आश्वासन; गुरपतवंत सिंग पन्नूचा दावा)

मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर 

सिरसा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘मी आज दिल्लीचे उपराज्यपाल आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे आतिशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक बेकायदेशीर आदेश दाखवला आणि हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी (Arvind Kejriwal) ईडी कस्टडीत राहून ऑर्डर पास केली आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक होते. हा मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर आहे. हे दिल्लीतील लोकांसोबत आणि मुख्यमंत्री कार्यालयासोबतचे गुन्हेगारी कारस्थान आहे. ‘सिरसा म्हणाले, ‘दिल्लीतील निवडून आलेल्या सरकारकडून मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग केला जात आहे. कारण ईडीच्या कस्टडीतून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) कुठलाही आदेश काढू शकत नाहीत. अशी कुठलीही तरतूद नाही. तरीही अरविंद केजरीवाल यांच्या नावाने जे चुकीचे काम करण्यात आले आहे, त्यासंदर्भात आपण उपराज्यपालांकडे, याची ताबडतोब चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा, असा आग्रह केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.