Arvind Kejriwal : केजरीवाल यांचे पैशाच्या बदल्यात दहशतवाद्याला सोडण्याचे आश्वासन; गुरपतवंत सिंग पन्नूचा दावा

146
Arvind Kejriwal : केजरीवाल यांचे पैशाच्या बदल्यात दहशतवाद्याला सोडण्याचे आश्वासन; गुरपतवंत सिंग पन्नूचा दावा
Arvind Kejriwal : केजरीवाल यांचे पैशाच्या बदल्यात दहशतवाद्याला सोडण्याचे आश्वासन; गुरपतवंत सिंग पन्नूचा दावा

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) ताब्यात आहेत. त्यांच्याविषयी अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) गुरपतवंत सिंग पन्नूने (Gurpatwant Singh Pannun) दावा केला आहे की, खलिस्तानी गटांनी 2014 ते 2022 दरम्यान आम आदमी पक्षाच्या तिजोरीत 133 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

(हेही वाचा – CM Pinarayi Vijayan : ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा)

देविंदर पाल सिंग भुल्लर 1993 दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पैशाच्या बदल्यात दहशतवादी देविंदर पाल सिंग भुल्लरला सोडण्याची धक्कादायक ऑफर दिल्याचा आरोपही पन्नू याने केला आहे. दहशतवादी देविंदर पाल सिंग भुल्लर याला 1993 च्या दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी घोषित करण्यात आले होते आणि तो तुरुंगात आहे. देविंदर पाल सिंग भुल्लर हा भारतीय इतिहासातील सर्वांत भयंकर दहशतवाद्यांपैकी एक मानला जातो.

न्यूयॉर्कमध्ये झाली गुप्त बैठक

केजरीवाल आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये झालेल्या बैठकीमुळे खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केले आहेत. त्यात म्हटले आहे की, 2014 मध्ये न्यूयॉर्कमधील रिचमंड हिल्स येथील एका गुरुद्वारामध्ये केजरीवाल आणि खलिस्तान समर्थक शिखांमध्ये गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आर्थिक मदतीच्या बदल्यात दहशतवादी भुल्लरला सोडण्याचे आश्वासन दिले होते.

केजरीवाल आधीच अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात आहेत. कथित दिल्ली उत्पादन शुल्क दारू घोटाळ्यात त्यांना अटक करण्यात आली आहे आणि अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतर सध्या ते कोठडीत आहेत. अटकेपासून संरक्षण मागितल्यानंतरही दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. परिणामी ईडीने त्यांना 28 मार्चपर्यंत नजरकैदेत ठेवले. (Arvind Kejriwal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.