IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई संघाबरोबर ‘अशी’ साजरी केली होळी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या संघाने मुंबईत दणक्यात होळी आणि धुळवड साजरी केली. 

137
IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई संघाबरोबर ‘अशी’ साजरी केली होळी
IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई संघाबरोबर ‘अशी’ साजरी केली होळी
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कप्तान रोहित शर्माने सोमवारी आपल्या आयपीएल संघ सहकाऱ्यांबरोबर धुळवड साजरी केली. चेहरा पूर्ण रंगाने माखलेला आणि पिचकारी तसंच पाईपमधून रंग उडवतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर रोहितने चक्क कॅमेरावरच पाणी फवारलं. आणि या व्हिडिओला त्याने मथळाच दिला आहे तो असा, ‘सर्वांना होळीच्या शुभेच्छा! हा फोन आता दुरुस्त करावा लागणार.’ (IPL 2024)

(हेही वाचा – Hurun Rich List 2024 : आशियातील अब्जाधीशांच्या यादीत चीनला मागे टाकत मुंबईची आगेकूच)

मुंबई संघाला हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध ६ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. फक्त मुंबईचा संघच नाही तर मुंबईचा मेंटॉर असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही होळीचा आनंद लुटला. आणि आपल्या ट्विटर हँडलवर सचिनने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सगळ्यांना होळीच्या सणाच्या आणि धुळवडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण यादगार बनवूया. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा,’ असं सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. (IPL 2024)

विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर या माजी क्रिकेटपटूंनीही चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (IPL 2024)

हेही पहा –  https://www.youtube.com/watch?v=fd95rq0Yw-k

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.