Karnataka Congress : कर्नाटक कॉंग्रेसची झोप का उडाली ?

78
Karnataka Congress : कर्नाटक कॉंग्रेसची झोप का उडाली ?

कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाचे आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा कॉंग्रेस हायकमांडच्या पायाखालची जमीन सरकली आहे. (Karnataka Congress) कॉंग्रेस मुख्यालयात अशी चर्चा रंगली आहे की, भारतीय जनता पक्ष कॉंग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन कर्नाटकात सत्तांतर घडवून आणण्याची योजना आखत आहे. 2018 मधील विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने बहुमत मिळवित कर्नाटकात सरकार स्थापन केले होते. काही काळानंतर काॅंग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली होती, हे येथे विशेष.

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने बहुमत मिळवित राज्यात सरकार स्थापन केले होते. आता या सरकारला धोका असल्याची सूचना हायकमांडला प्राप्त झाली आहे. भाजपने सरकारवर नाराज कॉंग्रेसच्या आमदारांशी संपर्क साधायला सुरवात केली आहे. हे आमदार सरकारमध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे समजते. (Karnataka Congress)

(हेही वाचा – ACP Office : एसीपीचे कार्यालय हडप करण्यासाठी दोन भावांना प्रवृत्त करणाऱ्या विकासकाचा पोलिसांकडून शोध)

अलीकडेच मुख्यमंत्री सिध्दरामैय्या यांनी ते पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी कायम रहाणार असल्याचे म्हटले आहे. या विधानामुळे कर्नाटकात काही तरी मोठे घडणार असल्याची शंका येऊ लागली आहे. मुख्यमंत्री सिध्दरामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून वाद आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कर्नाटकचा वाद मिटवून सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही नेत्यांची समजूत काढावी लागली होती. सिध्दरामैय्या यांचे सरकार पाच वर्षे टिकणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Karnataka Congress)

दुसरीकडे संयुक्त जनता दल आणि भाजपचे आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा कॉंग्रेसने नेते एम. बी. पाटील यांनी केला आहे. जेडीएसचे 10 आणि भाजपचे 25 असे 35 आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचा त्यांचा दावा आहे. कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या लवकरच 150 ते 160 होण्याची शक्यतासुध्दा त्यांनी वर्तविली आहे.

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदावर बसणार असतील, तर संयुक्त जनता दलाचे आमदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील, असे विधान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नुकतेच केले होते. यावर बोलतांना पाटील यांनी भाजप आणि जेडीएसचा समाचार घेतला. भाजप लोकांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. कॉंग्रेसमध्ये सगळे काही आलबेल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Karnataka Congress)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.