ACP Office : एसीपीचे कार्यालय हडप करण्यासाठी दोन भावांना प्रवृत्त करणाऱ्या विकासकाचा पोलिसांकडून शोध

सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) यांचे कार्यालय असणारे राज्य शासनाचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे.

94
ACP Office : एसीपीचे कार्यालय हडप करण्यासाठी दोन भावांना प्रवृत्त करणाऱ्या विकासकाचा पोलिसांकडून शोध
ACP Office : एसीपीचे कार्यालय हडप करण्यासाठी दोन भावांना प्रवृत्त करणाऱ्या विकासकाचा पोलिसांकडून शोध

सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) यांचे कार्यालय असणारे राज्य शासनाचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. एका विकासकाला ती जागा पाहिजे होती, व त्यानेच त्या जागेचे बोगस दस्तावेज तयार करून दिल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलीस चौकशीत दिली आहे. पोलिसांकडून या विकासकाचा शोध घेण्यात येत आहे. (ACP Office)

स्थावर मालमत्ता कामात गुंतलेल्या दोन भावांना राज्य सरकारच्या मालकीची आणि मुंबई पोलिसांना वाटप केलेली जमीन हडप करून विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. वसंत शाम गुल्हाने (५०) आणि राजन गुल्हाने (४५ ) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी काही विकासकांच्या सांगण्यावरून हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी आणखी अटक होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. (ACP Office)

(हेही वाचा – Shivaji Maharaj Statue at LOC : भारत-पाक नियंत्रण रेषेवर आता छत्रपतींची नजर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुल्हाणे बंधू हे चेंबूरमधील छेडा नगर येथील रहिवासी असून त्यांच्या पूर्वजांकडे अनेक जमिनी होत्या, त्यापैकी काही सरकारने अधिग्रहित केल्या आहेत. काही विकासकांनी या दोघांना अशा जमिनीवर हक्क सांगण्यास प्रवृत्त केले. “विकासकाने त्यांना खात्री दिली की सरकारी मालमत्ता मूळतः त्यांचीच आहे पूर्वी ती त्यांच्या पूर्वजांची होती. एका भावाला या जमिनींवर हक्क सांगण्यास सांगितले आणि त्या विकून भरघोस पैसा कमावण्यास सांगितले आणि ते त्यास बळी पडले,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (ACP Office)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.