Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना श्रीरामाचा अवमान भोवणार; नाशकात गुन्हा दाखल

250

एका बाजूला अयोध्येत भव्य श्रीरामाचे मंदिर उभे होत आहे. २२ जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. देशभरासह जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचे वातावरण असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी श्रीरामाचा अवमान करणारे वक्तव्य केले. ज्यामुळे हिंदू धर्मीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता जितेंद्र आव्हाडांना सवंग लोकप्रसिद्धीसाठी केलेले वक्तव्य चांगलेच भोवणार आहे. कारण त्यांच्या विरोधात नाशकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी श्रीरामाला बहुजनांचा राम असे संबोधित करून श्रीरामाच्या नावाने जातीयवाद केला. तसेच श्रीराम मांसाहार करत होता, असे सांगत श्रीरामाचा अवमान केला आहे. राम १४ वर्षे वनवासात होता, तो तिथे काय शाकाहार करणार? तो तिथे मांसाहार करत होता. राम आमचा आहे, बहुजनांचा आहे, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

(हेही वाचा Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना अटक करा; विश्व हिंदू परिषदेने केली मागणी)

काय म्हणाले महंत सुधीरदास महाराज? 

या प्रकरणी नाशिकच्या काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणी आव्हाडांच्या विरोधात नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे आता शिशुपालाप्रमाणे १०० अपराध भरले आहेत. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या रामाविषयीच्या वक्तव्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. आता हिंदू त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई करावी. आमच्या तक्रारींवर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आम्ही अॅडव्होकेट भिडे यांच्या माध्यमातून न्यायालयातही अर्ज दाखल करणार आहोत. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावरुन ज्या पद्धतीचे वक्तव्य वारंवार करत आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत अशी वक्तव्य होतात. त्यामुळे ईशनिंदा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्राने करावा. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत आम्ही त्यांनाही निवेदन देणार आहोत. असा कायदा झाला तर हिंदू देव-देवतांची टिंगलटवाळी थांबेल आणि गुन्हेगारांना शासन होईल. जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करावी, असे महंत सुधीरदास महाराज म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.