PM Modi Snorkeling : लक्षद्वीपमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला ‘स्नॉर्कलिंग’चा अनुभव; फोटो वायरल

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू, लक्षद्वीप, आणि केरळचा दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा दौरा अधिक लक्षवेशी ठरत आहे.

213
PM Modi Snorkeling : लक्षद्वीपमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला 'स्नॉर्कलिंग'चा अनुभव; फोटो वायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Snorkeling) यांनी भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये वास्तव्यादरम्यान स्नॉर्कलिंग करण्याचा प्रयत्न केला. या अनुभवाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच त्यांनी साहसी प्रेमींना त्यांच्या बकेट लिस्टमध्ये हे ठिकाण निश्चितपणे समाविष्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.

New Project 2024 01 04T153515.487

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

“ज्यांना आपल्यातील साहसी व्यक्तीला आलिंगन द्यायचे आहे, त्यांनी आपल्या लिस्टमध्ये लक्षद्वीपचा अवश्य उल्लेख करावा. मी माझ्या वास्तव्यादरम्यान स्नॉर्कलिंगचाही (PM Modi Snorkeling) प्रयत्न केला – किती आनंददायक अनुभव होता “, असे पंतप्रधानांनी गुरुवारी (४ जानेवारी) एक्स वर पोस्ट केले.

New Project 2024 01 04T153130.694

(हेही वाचा – Drugs : लोणावळ्यात दोन ठिकाणी पकडले एमडी ड्रग्ज; तीन आरोपींना अटक)

स्नॉर्कलिंग म्हणजे काय ?

स्नॉर्कलिंग (PM Modi Snorkeling) म्हणजे मुखवटा आणि श्वासोच्छवासाच्या नळीचा वापर करून पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पोहणे, ज्याला स्नॉर्कल म्हणतात. स्नॉर्कलर्स करतांना पाण्यात खोलवर डुबकी न मारता पाण्याखालील विहंगम दृश्ये पाहतात. स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग यामध्ये हाच फरक आहे.

New Project 2024 01 04T153319.231

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.