महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचाही गुजरातच्या विजयात वाटा; उद्धव ठाकरेंची टीका

76

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या जुन्या मित्रांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी चिमटे काढण्याची संधी सोडलेली नाही. ‘महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचाही गुजरातच्या विजयात वाटा’, असल्याची टीका ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छापर संदेशातून केली आहे.

(हेही वाचा – Pension Scheme: विवाहित जोडप्याला मोदी सरकार दर महिन्याला देणार १८,५०० रुपये! पण ‘ही’ आहे अट)

गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधानसभेचे निकाल लागले व तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. तर दिल्ली ‘मनपा’ निवडणुकीत ‘आप’ने भाजपवर मात केली. याबद्दलही ठाकरे यांनी काँग्रेस व आपचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

गुजरात विजयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते.’

‘आप’ने भाजपाचा फायदा केला

उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, ‘पंतप्रधान मोदी हे ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. आपने गुजरातेत मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते’, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.