प्रवाशांची होणार गैरसोय! मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक

91

येत्या रविवारी म्हणजेच ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकादरम्यान विशेष मेगाब्लॉ घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.

मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत स्थानकावर 8 क्रमांकाचे पोर्टल उभारण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कालावधी घेण्यात येणार विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक

दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.45 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत नागनाथ ते कर्जतपर्यंत आणि ठाकूरवाडी ते कर्जत डाउन आणि मिडल लाईनवर पॉवर ब्लॉक असणार आहे.

उपनगरीय गाड्यांची धावण्याची पद्धत

कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक कालावधीत कोणतीही उपनगरीय सेवा उपलब्ध असणार नाही.

खालील एक्स्प्रेस गाड्या लोणावळा येथे नियमित केल्या जातील आणि गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा उशिराने पोहोचतील.

  • ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • या पायाभूत सुविधांच्या अडथळ्यांमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.