मुंबईत दहशतवादी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण, कबरीचे मजारमध्ये रूपांतर?

133
मुंबईत १९९३ मध्ये बॉम्बस्फोट मालिका घडवून आणली होती, त्यामध्ये २५७ निरपराध लोकांचे जीव गेले होते. या प्रकरणात दोषी दहशतवादी याकूब मेनन याला फाशी देण्यात आली. २०१५ साली याकूबला नागपूर जेलमध्ये फाशी दिल्यानंतर त्याला मुंबईतील बडा कबरस्तानमध्ये दफन करण्यात आले. मात्र ७ वर्षांनंतर त्या कबरीचे मजारमध्ये रूपांतर करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण करून अप्रत्यक्षपणे दहशतवाद्याला खतपाणी घातले जात आहे, असे समोर आले आहे, असे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे.

कसे होतेय याकूबच्या कबरीचे उद्दात्तीकरण? 

  • या कबरीच्या भोवती एलईडी लाईट लावण्यात आल्या आहेत.
  • कबरीच्या भोवती हिरवी चादर गुंडाळण्यात आली आहे.
  • या कबरीच्या भोवती अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे.
  • हे सर्व पाहता याकूब मेननच्या कबरीचे कायमस्वरूपी जतन करण्याच्या हेतूने त्याच्या भोवती पक्के बांधकाम करण्यात आले आहे.

(हेही वाचा मुंबईत संध्याकाळी ५ वाजताच पसरला अंधार, मुसळधार पावसाची शक्यता)

याकूब मेनन कोण आहे, याकूब मेनन यामुळे काही कुटुंबे उद्धवस्थ झाली आहेत. त्यात १९९३च्या बॉम्बस्फोटात लोकांचे जीव गेले होते, याची चौकशी केली पाहिजे, खरतर त्या कबरीवर थुंकले पाहिजे, तिथे उदात्तीकरण करण्यासाठी सजावट करतात, याचे कुणी अधिकार दिले आहेत. याच्या चौकशीची मागणी आम्ही करत आहोत.
– नितेश राणे, भाजपा नेते

नियम काय सांगतो? 

नियमानुसार एखादी कबर १८ महिन्यानंतर पुन्हा खोदली पाहिजे. कारण तेवढ्या काळात मृतदेह नष्ट झालेला असतो आणि त्यानंतर ती जागा दुसरा मृतदेह दफन करण्यासाठी वापरला जातो. महापालिकेचा असा नियम आहे. मात्र याकूब मेननला  २०१५ साली दफन केले, त्याला ७ वर्षे उलटली तरीही याकूब मेननची कबर जशीच्या तशी आहे किंबहुना त्याच्या भोवती अतिरिक्त पक्के बांधकाम करून ती कबर कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न सुरु झाला.

या प्रश्नांची उत्तरे कबरस्थान प्रशासन देणार का? 

  • कबरस्तान प्रशासनाने याकूब मेननच्या कुटुंबियांना याकूबच्या कबरीची जमीन विकली आहे का?
  • अशा प्रकारे कबरस्तानची जागा कुणाला विकता येते का?
  • एखाद्या कबरस्तानात अशा प्रकारे एखादी कबर जर कायमस्वरूपी सुरक्षित केली जात असेल तर त्याची परवानगी घ्यायची आवश्यकता आहे का?
  • याकूबची कबर नियमानुसार १८ महिन्यांनी का खोदली नाही?
  • याकूबच्या कबरीचे कायमस्वरूपी बांधकामात रूपांतर करण्याआधी सरकारची परवानगी घेतली होती का?
  • तत्कालीन सरकारने याकूबच्या कबरीची विल्हेवाट लावण्याचा का निर्णय घेतला नाही?
  • दहशतवादी याकूब मेननचे अशा प्रकारे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का?
  • या ठिकाणच्या कबरी भोवती ५-७ कबरी लावता येतील इतकी जागा व्यापलेली आहे.

अशा प्रकारचे देशविरोधी लोक आहेत. तत्कालीन सरकारने या कबरीचे स्मारक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे होती, तशी घेतली नाही .
– संदीप देशपांडे, मनसे नेते

दरम्यान परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नसून या ठिकाणी असे काहीही नसल्याचे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.