कास पठारचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आता PMP ची ई-बस सेवा

108

कास पठाराचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आता पीएमपीची ई-बस सेवा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कास पठाराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीएमपी प्रशासनाला आदेश दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यात जाऊन कास पठारची पाहणी केली. सातारा ते कास पठार या मार्गावर पीएमपीची ई-बस सेवा सुरू करण्याचा मानस आहे. लवकरच या बाबत अधिकृत निर्णय जाहीर होईल.

(हेही वाचा – संजय राऊतांचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज, गुरूवारी होणारी सुनावणी?)

साताऱ्याजवळचे कास पठार पाहण्यासाठी पर्यटकाची मोठी गर्दी असते. पर्यटकांच्या वाहनांमुळे कास पठारच्या निसर्ग सौंदर्याला बाधा पोहचत आहे. वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण ही प्रशासना समोर डोकेदुखी ठरत आहे. हे टाळण्यासाठी राज्याचा पर्यटन विभागाने पीएमपीची ई-बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

खुद्द पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा ही सेवा सुरू करण्यास उत्सुक असल्याने पीएमपीला प्रशासनाला ताबडतोब पाहणी करून याचा अहवाल देण्यास सांगितला आहे. त्यानुसार मंगळवारी पीएमपीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कास पठारकडे धाव घेतली. येथे सेवा देणे कितपत शक्य आहे. याबाबरचा अहवाल लवकर दिला जाईल. हे करीत सर्वात मोठा प्रश्न हा चार्जिंग स्टेशनचा असणार आहे. चार्जिंग स्टेशन मुळेच सिंहगडाची पीएमपी सेवा स्थगित झाली होती, त्यामुळे याबाबतचा विचार देखील लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.