खासदार अनिल बोंडे यांनी सांगितला लव्ह जिहादचा ‘पॅटर्न’

93
सध्या अमरावतीत हिंदू मुलींना फसवून मुसलमान मुले त्यांचे धर्मांतर करत आहेत, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, वाढत्या लव्ह जिहादच्या प्रकरणांमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. खासदार अनिल बोंडे यांनी तर लव्ह जिहाद’चा पॅटर्नचा जाहीर केला आहे.

मुलींना कसे फसवले जाते? 

खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले की, लव्ह जिहाद प्रकरणात अनेक पॅटर्न आहेत. मुलींचे लैंगिक शोषण करणे, त्यांना ब्लॅकमेल करणे, त्यांना नशेची औषधे देणे, एवढेच नाही तर त्या मुलींच्या घरच्यांना धमक्या देणे त्या मुलीला सांगणे की तू जर ऐकले नाहीस, तर तुझ्या घरच्यांना जीवे मारु, अशा धमक्या दिल्या जातात. या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत, असे खासदार बोंडे म्हणाले. या मुलांना फंडिंग पण केले जाते, गाड्या घेऊन दिल्या जातात. आतापर्यंत अमरावतीतील चार प्रकरणे माझ्याकडे आली आहे. माझे आवाहन आहे की, कोणत्याही मुलीला किंवा त्यांच्या आई-वडिलांना असा त्रास दिला जात असेल तर माझ्याशी किंवा भाजपाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी कधीही संपर्क साधावा, असे खासदार अनिल बोंडे यांनी आवाहन केले आहे.

हमालपुरा भागात नक्की काय घडले? 

अमरावती शहरातल्या हमालपुरा भागात राहणारी एक तरुणी कालपासून बेपत्ता झाली. पण तिच्या कुटुंबियांनी तिचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त केली. मैत्रिणीकडून एका मुलाचे नाव समोर आले, पण त्या मुलीचा शोध काही लागला नाही. याचाच जाब विचारण्यासाठी नवनीत कौर राणांनी पोलिसांना फोन केला. पण पोलिसांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर नवनीत राणांचा संताप अनावर होत गेला. पोलिसांचाही संयम सुटला आणि मग गोष्टी आकांडतांडवापर्यंत पोहोचल्या. यावेळी नवनीत कौर राणांनी पोलिसांच्या टेबलावरचा रिमोटही आपटला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.