मुंबईत संध्याकाळी ५ वाजताच पसरला अंधार

164

बुधवार, ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. वातावरणात उकाडा जाणवत होता, मात्र संध्याकाळी ५.३० वाजता अचानक वातावरणात बदल झाला हा बदल इतका झाला कि मुंबईत २६ जुलै २००५ रोजी जसे वातावरण होते, तसे वातावरण निर्माण झाले. काही अवघ्या अर्धा तासात मुंबईवर गडद पावसाचे ढग जमले, संध्याकाळी ५. ३० वाजता चक्क रात्री ८ वाजताच वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कार्यालयात असणाऱ्यांच्या पोटात चक्क गोळा आला.

मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण

हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती, परंतु बुधवारच्या वातावरण एखाद्या ढग फुटीच्या आधीसारखीचे वातावरण दिसत होते. २६ जुलै २००५ रोजी अशाच प्रकारे दुपारच्या ३ वाजता रात्रीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    विशेष म्हणजे मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामंध्ये ढगफुटीसदृश्य वातावरण निर्मण झाले आहे.

सायंकाळच्या साडेपाचच्या नोंदीत सांताक्रूझ केंद्रात केवळ २.८ मिमी तर कुलाबा केंद्रात केवळ ३.२ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईतील बहुतांश भागांत दुपारी चार नंतर पावसाला सुरुवात झाल्याने कमाल तापमानावर फरक दिसून आला नाही. सांताक्रूझ येथे ३२.१ तर कुलाब्यात ३२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

गेल्या तीन तासांत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाजळ २१.३३ मिमी पाऊस पडला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात २५ मिमी पावसाची नोंद झाली. गिरगाव परिसरात २२.३५ मिमी पावसाची नोंद झाली असून, मध्य मुंबईत कांजुरमार्ग परिसारत २७.४२ मिमी पाऊस झाला. त्यातुलनेत कांदिवली, मालाड, विलेपार्ले, वर्सोवा, वांद्रे आदी परिसरात पावसाचा जोर जास्त दिसून आला नाही. दहावाजेपर्यंत मुंबईत हलका पाऊस राहील, ब-याच ठिकाणी विजांचा कडकडाट अधूनमधून सुरु राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

(हेही वाचा खासदार अनिल बोंडे यांनी सांगितला लव्ह जिहादचा ‘पॅटर्न’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.