कर्जबाजारी झाल्यामुळे नोकरानेच केला चोरीचा बनाव

111

मालकाचे २० लाख हडप करण्यासाठी नोकराने केलेला बनाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी मुलुंड पश्चिमेतील नोकर सुमित वाडेकर याच्यासह त्याला या कामात मदत करणाऱ्या मित्राला अटक केली आहे. शेअर्स बाजारामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे आपण हा बनाव केल्याची कबुली सुमितने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमित आणि त्याचा मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे .

काय आहे प्रकरण ?

सुमित वाडेकर हा मुलुंड पश्चिम येथील ‘सिद्धार्थ शहा असोसिएट’ या कंपनीत मागील काही वर्षांपासून नोकरी करीत होता. सुमित हा शेअर्स बाजारात देखील गुंतवणूक करीत होता, मात्र शेअर्स बाजारात त्याला यश आले नाही आणि कर्जबाजरी होऊन बसला होता. कर्जदार सतत त्याच्यामागे पैसे परत करण्यासाठी तगादा लावत होते. परंतु एवढी मोठी रक्कम कुठून आणायची असा प्रश्न सुमितला पडला होता. त्यात मालकाने त्याला शनिवारी एका क्लाईंटकडून २० लाख रुपयांची रक्कम आणायला सांगितली असता त्याने ही रक्कम हडप करण्याची योजना आखली, त्यात त्याने आपल्या एका मित्राला सामील करून लुटीचा बनाव रचला.

(हेही वाचा – विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन)

सुमित हा क्लाईंटकडून रक्कम घेऊन कार्यालयात पोहचला आणि त्याच्या मित्राने त्याच्या नाकावर रुमाल लावून त्याला बेशुद्ध करून रक्कम घेऊन पळून गेला होता. मालकाला सुमित हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला असता त्याला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. नंतर तो शुद्धीवर येताच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कार्यलयात एक अनोळखी व्यक्ती आली होती व त्याने माझ्या तोंडाला रुमाल लावून रक्कम घेऊन पळून गेल्याची माहिती मालकाला सांगितली.

याप्रकरणी मालकाने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असता पोलिसांना घटनस्थळी मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार संशयास्पद वाटला, त्यांनी सुमितला ताब्यात घेऊन त्याच्याकडे उलट तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपल्याला पैशाची गरज असल्यामुळे आपण हा बनाव केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मुलुंड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष कांबळे आणि पथकाने त्याच्या मित्राचा शोध घेऊन त्याला अटक करून चोरलेली सर्व रक्कम हस्तगत केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.