थेट सरपंचपदांसह १ हजार १६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

90

थेट सरपंच पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राज्यभरातील १ हजार १६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

( हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या विकासकामांचा गुरुवारी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव घेणार आढावा)

१३ सप्टेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. २८ सप्टेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

कोणत्या जिल्ह्यांतील किती ग्रामपंचायती?

१) ठाणे : कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, शहापूर- ७९.
२) पालघर : डहाणू – ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११, वाडा-७०.
३) रायगड : अलिबाग- ३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३, श्रीवर्धन- १.
४) रत्नागिरी : मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३, रत्नागिरी- ४, लांजा- १५, राजापूर- १०.
५) सिंधुदुर्ग : दोडामार्ग- २, देवडगड- २.
६) नाशिक : इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७, पेठ – ७१.
७) नंदुरबार : अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५, नवापूर – ८१.
८) पुणे : मुळशी- १, मावळ- १.
९) सातारा : जावळी- ५, पाटण- ५, महाबळेश्वर- 6.
१०) कोल्हापूर : भुदरगड- १, राधानगरी- १, आजरा- १, चंदगड- १.
११) अमरावती : चिखलदरा- १.
१२) वाशीम : वाशीम- १.
१३) नागपूर : रामटेक- ३, भिवापूर- ६, कुही- ८.
१४ वर्धा : वर्धा- २ व आर्वी- ७.
१५) चंद्रपूर : भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३०, ब्रह्मपुरी- १.
१६) भंडारा : तुमसर- १, भंडारा- १६, पवणी- २, साकोली- १.
१७) गोंदिया : देवरी- १, गोरेगाव- १, गोंदिया- १, सडक अर्जुनी- १, अर्जुनी मोर- २.
१८) गडचिरोली : चामोर्शी- २, आहेरी- २, धानोरा- ६, भामरागड- ४, देसाईगंज- २, आरमोरी- २, एटापल्ली- २, गडचिरोली- १.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.