Girish Mahajan: लोकसभेची एकतरी जागा जिंकून दाखवावी, गिरीश महाजनांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

118
Girish Mahajan: लोकसभेची एकतरी जागा जिंकून दाखवावी, गिरीश महाजनांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
Girish Mahajan: लोकसभेची एकतरी जागा जिंकून दाखवावी, गिरीश महाजनांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच आठवड्यात दोन वेळा राज्याच्या दौऱ्यावर आले. यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली. याला उत्तर देत भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महराष्ट्रात लोकसभेची एक जागा निवडून दाखवावी, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला. यावेळी ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागा महायुती जिंकणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लोकसभेची एक जागा जिंकून दाखवावी. ठाकरे गटाकडून २५ ते ३० जागांची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाने २५ जागांवर लढावं किंवा ३ जागांवर लढावं, पण एका जागेवर नीट लक्ष देऊन खासदार निवडून आणून दाखवावा.’

(हेही वाचा – Mumbai Viral Video : दोन तरुणांना टीसीशी हुज्जत पडली महागात; चर्चगेट-विरार एसी ट्रेनमधील प्रकार; व्हीडीओ व्हायरल )

महाजनांकडून पंतप्रधान मोदींची प्रशंसा

यावेळी पंतप्रधान मोदींची प्रशंसा करताना गिरीश महाजन म्हणाले की, नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार असल्याचं जनतेनं ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत आपण ४००हून अधिक जागा जिंकणार आहोत. सत्ता आल्यानंतर भारत जगात नंबर एक बनेल. जगातील नेते पंतप्रधान मोदींची प्रशंसा करतात. या पक्षाचे आपण कार्यकर्ते असल्याचेही ते म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.