Sakshi Malik : साक्षी मलिकचा कुस्तीपटूंना तात्पुरत्या समितीने आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला

कुस्तीपटूंसमोर सध्या पेच आहे. तो म्हणजे कुस्ती फेडरेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायचं की, तात्पुरत्या समितीच्या. 

120
Sakshi Malik : साक्षी मलिकचा कुस्तीपटूंना तात्पुरत्या समितीने आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला
Sakshi Malik : साक्षी मलिकचा कुस्तीपटूंना तात्पुरत्या समितीने आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीपटूंना ऑलिम्पिक असोसिएशन स्थापित तात्पुरत्या समितीने भरवलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला आहे. निलंबित कुस्ती फेडरेशनने आपली राष्ट्रीय स्पर्धा २९ जानेवारीला घेणार अशी अट्टाहासाची भूमिका घेतली आहे. तर हरयाणातील काही आखाड्यांनी या स्पर्धेला मान्यताही दिली आहे. (Sakshi Malik)

कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर आंदोलन उभं करून तेव्हाच्या कुस्ती फेडरेशनविरोधात दंड थोपटण्याचं महत्त्वाचं काम साक्षी मलिकने केलं होतं. तिला बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कार विजेत्या खेळाडूंचाही पाठिंबा होता. (Sakshi Malik)

कुस्ती फेडरेशन स्वायत्त संस्था

ब्रिजभूषण यांच्यानंतर त्यांचे निकटवर्तीय संजय सिंग कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष झाले (१२ डिसेंबरला कार्याकारिणी निवडणुका होईन) तेव्हाही संजय यांच्या पाठीवर बंदूक ठेवून ब्रिजभूषणच फेडरेशनचा कारभार चालवतील, असं म्हणत या खेळाडूंनी विरोध केला होता. संजय सिंग यांच्याविरोधात निवडणूक लढणाऱ्या अनिता हुडा यांना या खेळाडूंनी पाठिंबा दिला होता. (Sakshi Malik)

आता कुस्ती फेडरेशनला क्रीडा मंत्रालयाने निलंबित केलंय. आणि कुस्तीच्या कारभारासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने तात्पुरती समिती नेमलीय. पण, कुस्ती फेडरेशन ही स्वायत्त संस्था आहे, असं म्हणत संजय सिंग यांनी राष्ट्रीय स्पर्धा फेडरेशन मार्फत भरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Sakshi Malik)

तात्पुरत्या समितीला सरकारी यंत्रणांचा पाठिंबा आहे. तर कुस्ती फेडरेशनला राज्य कुस्ती संघटनांचा. दोघांनीही कुस्तीची राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याची घोषणा केली आहे. आणि काही आखाड्‌यांनी कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धेला मान्यताही दिली आहे. (Sakshi Malik)

(हेही वाचा – Support for Poor Prisoner या योजनेअंतर्गत ५७४ कैद्यांना होणार लाभ)

क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनची स्पर्धा मान्य करणार नाही

यावर मीडियाशी बोलताना, ‘मी खेळाडूंनी अशी विनंती करते की, त्यांनी तात्पुरत्या समितीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतच खेळावं. ती अधिकृत स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीची निवड करताना तीच स्पर्धा गृहित धरली जाईल. कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धेत खेळू नये.’ (Sakshi Malik)

गेल्या आठवड्यात तात्पुरत्या समितीने २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान जयपूर इथं राष्ट्रीय स्पर्धा घेण्याची घोषणा केली आहे. तर कुस्ती फेडरेशनने २९ जानेवारीला पुण्यात ही स्पर्धा भरवण्याचं जाहीर केलं आहे. क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनची स्पर्धा मान्य करणार नाही. आणि तिथे खेळलेल्या खेळाडूंना कुठलीही सरकारी सवलत, सुविधा मिळणार नाही, असं जाहीर केलं आहे. (Sakshi Malik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.