EPFO-Aadhaar Card : EPFO ने जन्माचा दाखला म्हणून आधार कार्ड ओळखपत्र हटवलं

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनं जन्मदाखला म्हणून आधार कार्ड न स्वीकारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

201
EPFO-Aadhaar Card : EPFO ने जन्माचा दाखला म्हणून आधार कार्ड ओळखपत्र हटवलं
EPFO-Aadhaar Card : EPFO ने जन्माचा दाखला म्हणून आधार कार्ड ओळखपत्र हटवलं
  • ऋजुता लुकतुके

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करताना जन्मदाखला किंवा जन्म तारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय १६ जानेवारीला जाहीर केला आहे. ईपीएओ ही संस्था केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आणि अलीकडेच आधार कार्ड देणाऱ्या युआयडीआयए या संस्थेनंच काही निर्देश जारी केले होते. त्यानुसार, जन्म तारीख प्रमाणित करणं हे आधार कार्डाचं उद्दिष्ट नाही. (EPFO-Aadhaar Card)

युआयडीएआयच्या या निर्देशांनंतर ईपीएफओनं हे बदल केले आहेत.

युआयडीएआयच्या निर्देशात म्हटलं आहे की, ‘काही केंद्रीय संस्था या आधार कार्डाचा स्वीकार जन्मतारीख पडताळणीसाठी करत आहेत. पण, २०१६च्या आधार कायद्यात तशी तरतूद नाही. आणि आधार कार्ड हे जन्मदाखला, किंवा जन्मतारीख प्रमाणित करण्यासाठी वापरलं जाऊ शकत नाही.’ आधार हे व्यक्तीची ओळख पटवतं, जन्मतारीख प्रमाणित करत नाही. (EPFO-Aadhaar Card)

(हेही वाचा – Mumbai Viral Video : दोन तरुणांना टीसीशी हुज्जत पडली महागात; चर्चगेट-विरार एसी ट्रेनमधील प्रकार; व्हीडीओ व्हायरल)

या निर्देशांनंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने हा बदल केला आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यासाठी जन्मतारखेची सत्यता तपासणाऱ्या कागदपत्रांची यादीही आता संस्थेनं अपडेट केली आहे. त्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घेतलेला प्रमाणित जन्मदाखला, शाळा, महाविद्यालयाचं निकालपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर, सिव्हिल सर्जनने प्रमाणित केलेलं जन्मतारखेचं पत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र या प्रमाणपत्रांनाच आता जन्मदाखल्यासाठी स्वीकारण्यात येईल. (EPFO-Aadhaar Card)

ज्या खातेधारकांनी यापूर्वी जन्मतारीख प्रमाणित करण्यासाठी आधारकार्ड वापरलं असेल त्यांना ईपीएफो वेबसाईटवर जाऊन आता तिथे दुसरं प्रमाणपत्र जोडावं लागेल. (EPFO-Aadhaar Card)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.