Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कर्जमाफीचा पहिला हप्ता खात्यात जमा; ६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

91
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचा पहिला हप्ता जाहीर करत आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकरी कर्ज माफी (farmer loan waiver) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून कर्जमाफीचे (farmer loan waiver) पैसे कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका क्लिकद्वारे रक्कम हस्तांतरीत केली. राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कोटी रुपये जमा  झालेत. (Shetkari Karjmafi)

(हेही वाचा – MSRTC : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवात प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी एसटीचा मोठा निर्णय)

शुक्रवारी, ८ ऑगस्टला राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ५०२९ कोटी रुपये ट्रान्स्फर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका क्लिकद्वारे रक्कम हस्तांतरित केली. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर रक्कम थेट जमा करण्यात आली. राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे. (Shetkari Karjmafi)

(हेही वाचा – KDMC च्या चालकाचा प्रताप; हप्ता मागताच संतप्त फेरीवाल्यांकडून धुलाई)

मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितले की, ‘जवळपास ५ हजार २९ कोटींचा पहिला हप्ता जमा झाला आहे. ६.२२ लाख शेतकऱ्यांची खाती आज नील करण्यात आली. कर्जाचे पैसे अकाऊंटमधले आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ते नील झाले आहे. जसेजसे अकाऊंट नील होतील तसे तसे पैसे खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील.’ तसेच ‘शेतकऱ्यांना फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचे आहे. हे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १२ लाख खाती सुधारणेसाठी बँकांना परत पाठवली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचे पैसे आणि दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहन पैसे दिले जाणार आहेत. ओटीएस नाही त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांवर सिबीलची अट घाालण्यात आली नाही. अकाऊंट जसे येतील तसे पैसे जमा होतील.’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.