MSRTC : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवात प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी एसटीचा मोठा निर्णय

88
MSRTC : ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! अखेर वेतनाची तारीख ठरली; 'या' तारखेला खात्यात येणार पैसे
  • प्रतिनिधी

MSRTC    गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाही व्यापक नियोजन सुरू केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी एसटी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. (MSRTC)

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जाणार असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वतः देखरेख करणार आहेत. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वाहन दुरुस्ती पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सतर्क राहणार आहे. (MSRTC)

(हेही वाचा – मोस्ट वॉन्टेड अब्बास सय्यद अखेर जेरबंद; Kalyan च्या खडकपाडा पोलिसांची लक्षवेधी कारवाई)

यंदाही गटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षण सुरू होणार आहे. या योजनेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे. (MSRTC)

एसटी महामंडळाने ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेलाही अधिक सुलभ केले आहे. प्रवासी अधिकृत संकेतस्थळ तसेच ‘MSRTC Bus Reservation’ या मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या आरक्षण करू शकणार आहेत. (MSRTC)

(हेही वाचा – Ramesh Mhatre ला न्यायालयाकडून जामीन मंजूर! राज्याबाहेर मुक्कामासह कडक अटी लागू)

नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटीने मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्या सेवेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर गणेशोत्सवासाठीही अधिक सक्षम नियोजन करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (MSRTC)

दरम्यान, परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, गणेशोत्सवानिमित्त ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी तब्बल ५,२२० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. गणपती बाप्पा, कोकण आणि एसटी यांचे अतूट नाते लक्षात घेऊन नफा-तोट्याचा विचार न करता ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून, प्रवाशांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (MSRTC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.