Ramesh Mhatre ला न्यायालयाकडून जामीन मंजूर! राज्याबाहेर मुक्कामासह कडक अटी लागू

Ramesh Mhatre ला न्यायालयाकडून जामीन मंजूर! राज्याबाहेर मुक्कामासह कडक अटी लागू

94
Ramesh Mhatre
डोंबिवलीचे शास्त्रीनगर रूग्णालय हिंसाचार प्रकरण; Ramesh Mhatre सह ५ आरोपींवर १८३२ पानांचे दोषारोपपत्र दाखल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला नगरसेवक रमेश म्हात्रेसह सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने कडक अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. आरोपींना या खटल्याचे आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे निर्देश दिले आहेत.(Ramesh Mhatre bail)

(हेही वाचा : Iran-Oman मध्ये ६० दिवसांच्या करारावर सहमती, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?)

महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश दिल्यामुळे रमेश म्हात्रे याचा मुक्काम कुठे असेल याची वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. जामिनावर सुटल्यानंतर रमेश म्हात्रेचा मुक्काम गोव्यातील नाझरी रिसॉर्टमध्ये असणार आहे. आरोपींना गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात आठवड्यातून तीन दिवस हजेरी लावावी लागणार आहे. तसेच, सर्व आरोपींचे पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.(Ramesh Mhatre bail)

(हेही वाचा : Extremist Publications Ban : दहशतवाद्यांच्या मनसुब्यांवर महाराष्ट्र सरकारचा स्ट्राइक! ११४ कट्टरपंथी मासिकांवर आणली जप्ती)

या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवली जाणार असून खटला सुरू झाल्यानंतर सर्व आरोपींनी सहकार्य करावे आणि पुढील तारखा मागू नयेत, असा इशाराही न्यायालयाने दिला. खटला पूर्ण होईपर्यंत सरकारी वकील न बदलण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी त्यांना व्हीसीद्वारे न्यायालयात हजर राहण्याची परवानगी मागितली. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. व्हीसीद्वारे हजर राहायचे असल्यास रीतसर अर्ज दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले.(Ramesh Mhatre bail)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.