Mumbai: महापालिका इमारतीत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी, मुंबई पोलिसांचा तपास सुरू

61
Nagpurमधील १८ शाळांसह अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून शोधमोहीम
Nagpurमधील १८ शाळांसह अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून शोधमोहीम

Mumbai: महापालिका इमारतीत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी महापौर कार्यालयाला ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपूर्वी महापौरांचे कार्यालय,मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा उल्लेख ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. मेल प्राप्त होताच पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, या ईमेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही व्यक्तिंची नावेदेखील आहेत. तसेच मुलांना शाळेत न पाठवण्याचा आणि मेट्रोने प्रवास न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सायबर पोलीस ई-मेलचा आयपी अॅड्रेस, स्त्रोत आणि ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.