‘प्रदेशाध्यक्ष बदलल्याशिवाय पुढे जाणे अवघड?’ NCP च्या बंद दाराआडच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

94
NCP logo featuring a clock and party colors.
बारामतीतील पराभवानंतर 'त्या' एका गुप्त सल्ल्याने फिरवली चक्रे; NCP मध्ये आता 'दादां'चा आवाज शांत करून कोणती नवी ताकद पुढे आणली जातेय?
  • प्रतिनिधी

NCP              राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदलांची चर्चा पुन्हा एकदा वेग धरत असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या धोरणात्मक नियोजनासंदर्भात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत राज्यातील नेतृत्व आणि संघटनात्मक कामकाजावर सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (NCP)

बैठकीत राज्यातील संघटनात्मक रचना, कार्यपद्धती आणि आगामी निवडणुकांची तयारी या मुद्द्यांवर सखोल विचारमंथन झाल्याचे समजते. विशेषतः पक्षाचे राज्यातील नेतृत्व आणि स्थानिक संघटन यांच्यात अधिक समन्वयाची आवश्यकता असल्याचे मत काही उपस्थितांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. (NCP)

(हेही वाचा – Extremist Publications Ban : दहशतवाद्यांच्या मनसुब्यांवर महाराष्ट्र सरकारचा स्ट्राइक! ११४ कट्टरपंथी मासिकांवर आणली जप्ती)

सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी झालेल्या तीन बैठकींमध्येही याच मुद्द्यावर चर्चा झाली होती. मात्र, अपेक्षित बदल दिसून न आल्यास भविष्यात प्रभावीपणे काम करणे कठीण होईल, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. (NCP)

येत्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाला अधिक आक्रमकपणे काम करायचे असेल, तर संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाचे निर्णय घेणे अपरिहार्य ठरू शकते, अशीही चर्चा बैठकीत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (NCP)

(हेही वाचा – BCCI Selectors Controversy : अजित आगरकर यांनी घेतलेले ४ निर्णय जे वादग्रस्त ठरले)

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीममधील दोन सदस्य उपस्थित होते. तसेच जय पवार यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभाग घेतल्याची माहितीही समोर आली आहे. (NCP)

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “जोपर्यंत राज्यातील नेतृत्व एकसंघपणे काम करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात प्रभावीपणे काम करणे कठीण आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. भविष्यातील निवडणुकांसाठी आपल्याकडून अपेक्षित काम करून घ्यायचे असेल, तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घेणे आवश्यक ठरेल, असेही त्यांनी बैठकीत सूचित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.