English Cricketer Retirement : ‘या’ इंग्लिश क्रिकेटपटूने २५ व्या वर्षीच सोडलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट

English Cricketer Retirement : उदयोन्मुख गोलंदाज म्हणून त्याची ओळख होती. 

77
English cricketer John Turner in blue jersey
English Cricketer Retirement : 'या' इंग्लिश क्रिकेटपटूने २५ व्या वर्षीच सोडलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट
  • ऋजुता लुकतुके

English Cricketer Retirement                इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने अवघ्या २५ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या दुखापतींच्या संघर्षामुळे अखेर हा कठीण निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने स्पष्ट केले. इंग्लंडच्या क्रिकेटमधील उदयोन्मुख वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टर्नरच्या अकाली निवृत्तीमुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. (English Cricketer Retirement)

दक्षिण आफ्रिकेतील जोहानसबर्ग येथे जन्मलेल्या टर्नरला २०२४ मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने दोन एकदिवसीय आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत आशादायी मानली जात होती आणि भविष्यात तो इंग्लंडच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. (English Cricketer Retirement)

(हेही वाचा – Football Accident : भर मैदानात वीज अंगावर पडून एका थाई फुटबॉलपटूचा मृत्यू, शोकांतिका कॅमेरात कैद)

मात्र सततच्या दुखापतींनी त्याच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला. पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तो जून २०२५ पासून व्यावसायिक क्रिकेटपासून दूर होता. उपचार, पुनर्वसन आणि पुनरागमनाचे अनेक प्रयत्न करूनही तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही. अखेर दुखापतींमुळेच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय त्याने घेतला. (English Cricketer Retirement)

निवृत्तीची घोषणा करताना टर्नरने भावनिक निवेदन प्रसिद्ध केले. “व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते. हॅम्पशायर आणि इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. मात्र दुखापतींमुळे आता पुढे जाणे शक्य नाही,” असे त्याने म्हटले. त्याने प्रशिक्षक, सहकारी खेळाडू, वैद्यकीय पथक आणि चाहत्यांचे आभारही मानले. (English Cricketer Retirement)

(हेही वाचा – Meta ला अमेरिकन न्यायालयाचा मोठा दणका! ठोठावला ५ हजार कोटींचा दंड; बालहक्कांची पायमल्ली केल्याप्रकरणी कारवाई)

टर्नरचा हॅम्पशायर क्लबसोबत २०२७ पर्यंत करार होता आणि तो इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या विकास कराराचाही भाग होता. हॅम्पशायरचे क्रिकेट संचालक गाइल्स व्हाईट यांनी टर्नरचे कौतुक करत तो अत्यंत प्रतिभावान आणि समर्पित खेळाडू असल्याचे सांगितले. त्याच्यात इंग्लंडसाठी दीर्घकाळ खेळण्याची क्षमता होती, असेही त्यांनी नमूद केले. (English Cricketer Retirement)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.