Maratha Reservation : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारांची मराठा आरक्षणाच्या बैठकीला दांडी

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उबाठा गटाच्या खासदारांनी सपशेल पाठ फिरविली आहे.

369
Maratha Reservation : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारांची मराठा आरक्षणाच्या बैठकीला दांडी
Maratha Reservation : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारांची मराठा आरक्षणाच्या बैठकीला दांडी

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उबाठा गटाच्या खासदारांनी सपशेल पाठ फिरविली आहे. (Maratha Reservation)

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सोमवारी (१८ डिसेंबर) नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलाविली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्या संसदेत उचलावा आणि आरक्षणाच्या मार्गातील प्रश्न कसे सोडविता येईल? यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. (Maratha Reservation)

‘या’ खासदारांनी मारली दांडी 

मात्र, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या खासदारांना ही बैठक महत्वहीन वाटली. यामुळे या सर्वांनी बैठकीला दांडी मारली आहे. सध्या लोकसभेत महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा एकही खासदार नाही. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) चे तीन खासदार आहेत. यात सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा समावेश आहे. तर उबाठा गटाचे विनायक राउत, अरविंद सावंत आणि राजन विचारे आहेत. या सर्वांनी मराठा आरक्षणाशी (Maratha Reservation) संबधित महत्वपूर्ण बैठकीला दांडी मारली आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Maratha Reservation : महाराष्ट्रात आरक्षणासाठी ‘बिहार पॅटर्न’

‘हे’ खासदार होते उपस्थित 

दरम्यान, महाराष्ट्र सदनात बैठकीला सुरुवात झाली आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री कपिल पाटील, राहुल शेवाळे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, धनंजय महाडिक, डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, उदयनराजे भोसले, ओमराजे निंबाळकर, प्रतापराव जाधव, सुधाकर श्रृंगारे, गजानन कीर्तीकर, भावना गवळी, रणजीतसिंग नाईक निंबाळकर, प्रतापराव चिखलीकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित आहेत. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.