उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाले ‘मी त्यांना…’

135

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज, २७ जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. मात्र शिवसेनेतील अनपेक्षित बंडामुळे राज्यात राजकीय संकटाचं सावट त्यांच्या या वाढदिवसावर दिसतेय. अशातच आता बंडखोरांचे नेते म्हणून बोलले जात असलेल्या, आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसांनिमित्त प्रत्येक स्थरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

(हेही वाचा – रस्त्यांच्या छोट्या निविदा न काढता शहर व उपनगरासाठी स्वतंत्र कंत्राट द्यावी: भाजपची मागणी)

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये पक्षप्रमुख असा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा यावरून न्यायालयात वाद गेला आहे. अशातच शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख टाळला की अनावधानाने राहिला, याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

असे आहे ट्वीट

‘माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो!’ असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे. मात्र यामध्ये कुठेही पक्षप्रमुख म्हणून त्यांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे अनावधानाने की ठरवून हे केले आहे, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

असे आहे एकनाथ शिंदेंचे ट्वीट 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. यासह माजी मंत्री गुलाबराव पाटील, शिवाजी आढळराव पाटील, धैर्यशील माने यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या मात्र त्यांच्या नावापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलेला दिसतोय.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.