मी त्यांना गद्दार बोललो नाही, ते विश्वासघातकी – उद्धव ठाकरे

103

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा एक भाग 26 जुलै आणि दुसरा भाग 27 जुलैला प्रसारित झाला. बुधवारी प्रसारित झालेल्या या भागात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना गद्दार न म्हणता विश्वासघातकी म्हटले आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, फुटीर गटाची विनंती मान्य करुन मी त्यांना गद्दार बोललेलो नाही.

त्यांचाही मान ठेवायला हवा

उद्धव ठाकरे यांनी गद्दार न म्हणण्याच्या शिंदे गटाच्या विनंतीला मान दिल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी त्यांना विश्वासघातकी बोललो. गद्दार बोललो नाही. त्यांचा पण मान ठेवला आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

शिवसेनेचे तुफान निर्माण होईल

ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील जनेतच्या मनात शिवसेना आहे. शिवसेनेचे तुफान आहेच. लोकांच्या मनात आणि ह्रदयात शिवसेना आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेचे तुफान निर्माण होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाले ‘मी त्यांना…’ )

मुंबईवर भगवा फडकवणारच

या मुलाखतीत ठाकरे यांनी मुंबईवर पुन्हा भगवा फडकणारच असा दावा केला आहे. या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही, असे अनेकांनी म्हटले आहे. मुंबईकर एकवटले आहेत. हिंदूंमध्ये फूट पाडली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. मराठी आणि अमराठी अशी फूटही पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्याला कोणी बळी पडणार नाही. आम्ही आणि मुंबईकर फक्त निवडणुकीची वाट पाहत आहोत. मुंबईच्याच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.