Ashok Chavan Met Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच अशोक चव्हाणांनी घेतली जरांगेंची भेट

मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. हा मराठा समाजाचा विषय चर्चा करून सुटायला पाहिजे. ही भूमिका माझी पहिल्यापासूनच आहे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो.

205
Ashok Chavan Met Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच अशोक चव्हाणांनी घेतली जरांगेंची भेट

नुकताच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. अशातच भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री अचानक मनोज जरांगे (Ashok Chavan Met Manoj Jarange) यांची भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचा – Manoj Jarange : “..तर सरकारला धडा शिकवला जाईल”)

एकीकडे जरांगे यांची सतत देवेंद्र फडणवीसांवर होणारी टीका आणि अचानक अशोक चव्हाण आणि जरांगे यांची भेट यामुळे राज्यातील राजकारण काही नवीन वळण घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (Ashok Chavan Met Manoj Jarange)

ही अराजकीय भेट असल्याचं अशोक चव्हाण आणि जरांगे यांनी सांगितलं आहे.

(हेही वाचा – Prasar Bharati: नवनीत कुमार सहगल प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष)

काय म्हणाले अशोक चव्हाण ?

मनोज जरांगे पाटील (Ashok Chavan Met Manoj Jarange) यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. हा मराठा समाजाचा विषय चर्चा करून सुटायला पाहिजे. ही भूमिका माझी पहिल्यापासूनच आहे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी उमेदवार पण नाही.” असं अशोक चव्हाण म्हणाले.

(हेही वाचा – PM Narendra Modi : “मी तर २०४७ ची तयारी करतोय” – पंतप्रधान मोदींचं सूचक विधान)

काय म्हणाले जरांगे पाटील ?

अशोक चव्हाण (Ashok Chavan Met Manoj Jarange) एक समाज म्हणून भेटायला आले होते. सरकारकडून आले आहेत का? असं मी आधी विचारले. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करु म्हणले होते ती आजपर्यंत का केली नाही. गुन्हे परत घेण्याऐवजी जास्त गुन्हे वाढत आहेत. हैदराबाद गॅझेट घेतो म्हणाले होते ते का घेतले नाही? ते समाज म्हणून करत असतील तर आम्ही अशोक चव्हाण यांना दोष देणार नाहीत. आमची फसवणूक झाली आहे हे आम्ही त्यांना ठासून सांगितले आहे. जाणून बुजून गृहमंत्री यांनी खोटे केसेस दाखल करायला लावले. सग्या सोयऱ्याची अमलबजावणी केलीं नाही आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी केली नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. (Ashok Chavan Met Manoj Jarange)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.