Rubber Band : १७ मार्च आजच्या दिवशी निर्माण झाला होता रबर बॅंड!

118
Rubber Band : १७ मार्च आजच्या दिवशी निर्माण झाला होता रबर बॅंड!
Rubber Band : १७ मार्च आजच्या दिवशी निर्माण झाला होता रबर बॅंड!

आज आपण रबर बॅंडचा (Rubber Band) वापर सहज करतो. अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या पाहून आपल्याला आश्चर्य वाटत नाही. कारण त्या आपल्या सवयीच्या झालेल्या असतात. मात्र जेव्हा त्या वस्तूचा शोध लागतो, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटत असतं. रबर बॅंडचंही तसंच आहे. रबर बँड (Rubber Band) हा सहसा रिंग किंवा अंडाकृती आकाराचा असतो आणि अनेक वस्तू एकत्र बांधून ठेवण्यासाठी याचा वापर होतो.

(हेही वाचा- Ashok Chavan Met Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच अशोक चव्हाणांनी घेतली जरांगेंची भेट)

रबर बॅंडचा (Rubber Band) शोध लागला १७ मार्च १८४५ मध्ये… स्टीफन पेरी (Stephen Perry) यांनी इंग्लंडमध्ये १७ मार्चला रबर बँडचे पेटंट घेतले होते. त्यामुळे आजच्या दिवशी जगातला पहिला रबर बॅंड निर्माण झाला, असे म्हणायला हवे. रबर बॅंडला (Rubber Band) प्रसिद्धी मिळाली ती १९२३ मध्ये. व्हिलियम एच. स्पेन्सर यांनी अलायन्स रबर कंपनीची स्थापना केली. अक्रोन बीकन जर्नल आणि टुलसा वर्ल्ड या वर्तमानपत्राच्या निर्मात्यांना सेन्सर यांनी त्यांची वर्तमानपत्रे उडू नये म्हणून रबर बॅंडने गुंडाळायला सांगितले आणि अशा प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनात रबर बॅंडचा प्रवेश झाला. (Rubber Band)

(हेही वाचा- PM Narendra Modi : “मी तर २०४७ ची तयारी करतोय” – पंतप्रधान मोदींचं सूचक विधान)

पुढे स्पेन्सरच्या प्रयत्नांमुळे विविध गोष्टींसाठी रबरचा वापर होऊ लागला. कृषी आणि औद्योगिक वापरासाठी रबरला पसंती मिळाली. पुढे स्पेन्सर यांनी १९ फेब्रुवारी १९५७ “मेथड फॉर मेकिंग इलेक्ट्रिक बॅंड्स” यासाठी पेटंट मिळवले. मग ओपन रिंग डिझाइनमध्ये बॅंड्स तयार होऊ लागले. आता तर रबर बॅंडमध्ये उत्क्रांती झाली असून आपल्या दैनंदिन आयुष्यात बॅंडचा सर्रास वापर होतो. (Rubber Band)

हेही पहा- 

https://www.youtube.com/watch?v=CPfazKQqnY0

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.