Manoj Jarange : “..तर सरकारला धडा शिकवला जाईल”

सरकारने जर आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती आम्ही गुलाल पडू देणार नाही. सरकारला या सर्व बाबींचा परिणाम हा भोगावाच लागेल.

158
Manoj Jarange-Patil : लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शनिवारी मोठा निर्णय घेणार

सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील असे सांगून सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय न झाल्याने सरकारवर टीका केली आहे.

(हेही वाचा – Manoj Jarange : “मला कधीही अटक होऊ शकते”; असं का म्हणाले जरांगे पाटील ?)

काय म्हणाले जरांगे पाटील ?

सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange) यांनी छावा संघटनेचे नेते विलास पांगारकर हे आजारी असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना; आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वांनी आपले प्रयत्न केले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले की, “सरकारने जर आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती आम्ही गुलाल पडू देणार नाही. सरकारला या सर्व बाबींचा परिणाम हा भोगावाच लागेल. आता मराठा समाज हा आरक्षणासाठी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.”

(हेही वाचा – Prasar Bharati: नवनीत कुमार सहगल प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष)

निवडणुका पुढे ढकलाव्या :

जरांगे पाटील (Manoj Jarange) पुढे म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित होते. या निवडणुका पुढे ढकलाव्या कारण हा समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. (Manoj Jarange)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.