Shrinivas Khale : सर्वांचे लाडके खळे काका अर्थात संगीतसृष्टीतील महान संगीतकार !

२०१० साली श्रीनिवास खळे यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

101
Shrinivas Khale : सर्वांचे लाडके खळे काका अर्थात संगीतसृष्टीतील महान संगीतकार !
Shrinivas Khale : सर्वांचे लाडके खळे काका अर्थात संगीतसृष्टीतील महान संगीतकार !

श्रीनिवास खळे (Shrinivas Khale) हे भारतीय संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होते. लोक त्यांना खळे काका म्हणून ओळखायचे. त्यांचा जन्म कोकणातील रायगड जिल्ह्यातील एका हिंदू कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव विनायक काशीराम खळे असं होतं. तर आईचं नाव लक्ष्मी विनायक खळे असं होतं.

श्रीनिवास खळे (Shrinivas Khale) यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमधून संगीताचं डिप्लोमा शिक्षण घेतलं. त्यानंतर आग्रा येथील अत्रोली घराण्याचे मधुसूदन जोशी यांच्याकडूनही संगीताचं प्रशिक्षण घेतलं.

श्रीनिवास खळे (Shrinivas Khale) यांनी केवळ मराठी चित्रपटांसाठीच संगीत दिलं नाही, तर इतर अनेक भारतीय भाषांमधल्या चित्रपटांना संगीत दिलं आहे. संस्कृत, बंगाली, गुजराती आणि हिंदी या भाषांचा त्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकशे एक्केचाळीस कवितांना संगीतबद्ध करून त्यांचं रेकॉर्डिंग केलं आहे. तसेच सहा मराठी चित्रपटांसाठीही संगीत दिलं आहे. यंदा कर्तव्य आहे, बोलकी बाहुली, पळसाला पाने तीन, जिव्हाळा, पोरकी आणि सोबती ही श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची नावं आहेत.

(हेही वाचा – Kenya Dam Burst: केनियामध्ये धरण फुटल्याने ४०हून अधिक लोकांचा मृत्यू, बचावपथक घटनास्थळी दाखल)

याव्यतिरिक्त लक्ष्मी पूजन नावाच्या चित्रपटालाही त्यांनी संगीत दिले होते. पण हा चित्रपट कधीही प्रदर्शित झाला नाही. चित्रपटांप्रमाणेच त्यांनी काही संगीत नाटकांसाठी सुद्धा संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांपैकी पाणीग्रहण, विदूषक आणि देवाचे पाय अशी त्या संगीत नाटकांची नावं आहेत.

सप्टेंबर २००९ साली श्रीनिवास खळे (Shrinivas Khale) यांचा शेवटचा अल्बम प्रदर्शित झाला होता. नाथ माझा, मी नाथांचा असं त्या अल्बमचं नाव आहे. त्यामध्ये संत कृष्णादासांचे अभंग आणि इतर भक्तीगीतांचा समावेश आहे. सध्याचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन हे त्यांचे शिष्य आहेत.

२०१० साली श्रीनिवास खळे (Shrinivas Khale) यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. हृदयेश आर्ट्स यांच्यातर्फे दरवर्षी संगीत सृष्टीमध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांना स्वर श्रीनिवास हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. कमलेश भडकमकर यांनी हा पुरस्कार मिळवण्याचा पाहिला मान पटकावला आहे. त्यांनी श्रीनिवास खळे यांच्यासोबत कामही केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.