Kenya Dam Burst: केनियामध्ये धरण फुटल्याने ४०हून अधिक लोकांचा मृत्यू, बचावपथक घटनास्थळी दाखल

124
Kenya Dam Burst: केनियामध्ये धरण फुटल्याने ४०हून अधिक लोकांचा मृत्यू, बचावपथक घटनास्थळी दाखल

पूर्व आफ्रिकेतील केनिया देशात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टी झाल्याने येथील एक धरण फुटले आहे. यामध्ये जवळपास ४० हून अधिक व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे, तर अनेक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे. (Kenya Dam Burst)

मिळालेल्या अधिक महितीनुसार, राजधानी नैरोबीपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या माई महियू गावात ही घटना घडली आहे. रात्री नागरिक झोपेत असताना धरण फुटले. त्यामुळे अनेक जण झोपेतच वाहून गेले आहेत. संपूर्ण गावात चिखल आणि गाळ साचला आहे. यामुळे बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Baba Ramdev: पतंजलीच्या १४ औषधांवर बंदी, उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाची कारवाई)

मुसळधार पावसामुळे रस्ता खचला
धरण फुटल्याने यामध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं आहे. अनेकांची घरंदेखील वाहून गेली आहेत. गावात सध्या पाहिलं तर पूरसदृश्य परिस्थिती असून ठिकठिकाणी मोडलेली घरं, झाडं आणि सर्वत्र चिखल पसरल्याचं दिसत आहे. नागरिक आपल्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी कासावीस झाले आहेत. मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्याचा काही भाग देखील खचला आहे. त्यामुळे बचाव पथकाला गावात प्रवेश करण्याआधी खचलेल्या रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासनूच या गावामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.