Nagpur airport : नागपूर विमानतळ उडवण्याची धमकी, ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

सुरक्षा यंत्रणांनी विमानतळावर बंदोबस्त वाढवला तसेच प्रत्येकाची चौकशी केली जात आहे.

106
Nagpur airport : नागपूर विमानतळ उडवण्याची धमकी, ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमध्ये दहशतवाद्द्याने विमाने स्फोटकाने उडवून देण्याचा इशारा दिला आहे. ही धमकीमुळे विमानतळ व्यवस्थापन चिंतेत, तर प्रशासन अलर्च मोडवर आले आहे.

सीआयएसएफ आणि पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम सुरू केली आहे, पण कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. सोमवारी, सकाळी ९.४५ वाजता विमानतळ व्यवस्थापनाला ई-मेलद्वारे देण्यात आली. विमानतळावर पोलिसांची १५-१५ असी दोन पथके तैनात केली आहेत. परिसरातील घडामोडींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.

(हेही वाचा – Shrinivas Khale : सर्वांचे लाडके खळे काका अर्थात संगीतसृष्टीतील महान संगीतकार ! )

कोल्हापूर, जयपूर, गोवा येथेही धमकी
– नागपूर विमानतळाप्रमाणे सोमवारी जयपूर, आगरतळा, श्रीनगर, चंदीगड आणि वाराणसी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल विमानतळांना मिळाला.
-त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानतळावर बंदोबस्त वाढवला तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात आहे.
-कोलकाता विमानतळाला मागील ३ दिवसांत हा दुसरा धमकीचा मेल मिळाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.