Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी ‘एआरसी एडेलवेस’ कंपनीची चौकशी होणार

106
Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी 'एआरसी एडेलवेस' कंपनीची चौकशी होणार

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी केली.

(हेही वाचा – Vijay Wadettiwar : अखेर विरोधीपक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार विराजमान)

आपल्या कर्तृत्त्वाने, प्रतिभेने कलादिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे नितिन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी दुर्दैवीरीत्या आपले जीवन संपवले. त्यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले होते. या १८० कोटींचे २५२ कोटी झाले. या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाईस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसूलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी सभागृहात केली.

दरम्यान, या कंपन्या आधुनिक सावकार असून त्यांची अन्य दोन प्रकरणाची माहिती आपल्याकडे असून तीही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचे सांगितले. त्यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी अशी चौकशी करण्याचे मान्य केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.