National Organ Donation Day : नव्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत ५ हजार रुग्ण

राष्ट्रीय अवयवदान दिन

135
National Organ Donation Day : नव्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत ५ हजार रुग्ण
National Organ Donation Day : नव्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत ५ हजार रुग्ण

अवयवदानाबाबत (Organ Donation) समाजात अद्यापही फारशी जनजागृती नसल्याने राज्यात ५ हजार रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यरोपण समितीने दिली. वाढत्या औषधाच्या सेवनाने मूत्रपिंडावर (kidney) दुष्परिणाम दिसून येतो. औषधाचे अतिरिक्त सेवन आणि शीतपेयांचा मारा यामुळे मूत्रपिंड खराब होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मूत्रपिंड निकामी (Kidney failure) होण्याच्या किमान तीन केसेस आम्ही दर महिन्याला पाहतोय, असेही अवयवदान चळवळीतले (Organ donation movement) कार्यकर्ते म्हणाले.

वाढत्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या (Kidney transplant) मागणीमुळे मूत्रपिंड निकामी होणे हे प्रमुख कारण असले तरीही त्याला चुकीची जीवनशैली कारणीभूत असल्याचे डॉक्टर्स सांगतात. मॉल्स आणि हॉटेल्समध्ये तरुणवर्गाकडून वाढती शीतपेयांची मागणी, सततच्या अंगदुखीवर मात करण्यासाठी औषध विक्रेत्याकडून थेट पेनकिलर गोळी घेणे आदी प्रकार वाढत असल्याचे सांगण्यात आले. कामावर सतत सक्रिय राहण्याच्या ताणात बराच नोकरदारवर्ग डॉक्टरांशी सल्लामसलत न करता गोळ्यांचे सेवन करतोय. हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागलाय.

परिणामी, मूत्रपिंडावर (kidney) ताण येत दुखणे असह्य झाल्यानंतर रुग्ण (patient) आमच्याकडे येतात, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अगदी विशीतल्या तरुणांनाही मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या दिसून आली आहे. सततच्या दारूच्या व्यसनात अडकलेल्या तरुणांनी वेळीच सावध राहणे गरजेचे आहे. कोरोनाकाळानंतर मुंबईत कमी झालेल्या अवयवदानाची गती अद्यापही संथ आहे. मूत्रपिंडाच्या मागणी एवढा पुरवठा नसल्ल्याचे अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.

(हेही वाचा – Tomato Price Hike : दिल्लीत टोमॅटोने गाठला विक्रमी दर, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत ‘इतके’ रुपये)

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च दहा लाखांच्या घरात!

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची बाजारातील वाढती मागणी लक्षात घेता आता खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेचा (Surgery) खर्च दहा लाखांच्या घरात पोहोचला आहे. येत्या काळात शस्त्रक्रियेच्या दरात अजून वाढ होण्याची भीती आहे. सर्व विमा कंपन्या आता मूत्रपिंड प्रत्यरोपण शस्त्रक्रियेला विमा कवच (Insurance cover) देत नसल्याने रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचेही अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.