Tomato Price Hike : दिल्लीत टोमॅटोने गाठला विक्रमी दर, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत ‘इतके’ रुपये

प्रतिकिलो टोमॅटोसाठी ग्राहकांना २०० रुपये मोजावे लागत आहेत

134
Tomato Price Hike : दिल्लीत टोमॅटोने गाठला विक्रमी दर, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'इतके' रुपये
Tomato Price Hike : दिल्लीत टोमॅटोने गाठला विक्रमी दर, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'इतके' रुपये

देशाच्या राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये टोमॅटोने (tomato) विक्रमी दर गाठला आहे. त्यामुळे आता प्रतिकिलो टोमॅटोसाठी ग्राहकांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीतील मदर डेअरीने (mother dairy) सफाल रिटेल आउटलेटवर (Safal Retail Outlet) टोमॅटोची २५९ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. अतिवृष्टीचा फटका प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांना बसल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत.

सध्या देशभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (tomato price hike) झाली आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात टोमॅटोला मागणी आहे, त्या प्रमाणात पुरवठा होताना मात्र दिसून येत नाही. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोची किरकोळ किंमत बुधवारी (२ ऑगस्ट) २०३ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. तर, मदर डेअरीच्या सफाल रिटेल आउटलेटवर त्याची किंमत २५९ रुपये प्रतिकिलो होती.

(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली)

एप्रिलच्या १५ तारखेपासून तीन ते चार जूनपर्यंत बाजारात टोमॅटो कचऱ्यासारखा फेकून दिला जात होता. उत्पादन खर्च निघणेही शक्य नव्हते. याचा मोठा आर्थिक फटका (financial loss) शेतकऱ्यांना बसला. साधारण: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. एप्रिल ते मे महिन्यांदरम्यान प्रचंड उन्हामुळे आणि टोमॅटोला चांगला दर येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोची (tomato) लागवड करणे सोडून दिले. लागवड न झाल्यामुळे बाजारात माल आला नाही त्यामुळे बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.