Indo – US Trade Deal : भारत, अमेरिका व्यापारी करारावर डोनाल्ड ट्रंप आता काय म्हणाले?

Indo - US Trade Deal : नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा ट्रंप यांनी व्यक्त केली 

210
Indo US Trade : भारत अमेरिकेकडून गरजेच्या १० टक्के इंधन विकत घेणार
Indo US Trade : भारत अमेरिकेकडून गरजेच्या १० टक्के इंधन विकत घेणार
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करारावरील चर्चा अजूनही सुरूच आहे. आणि नरेंद्र मोदींची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा पुढे नेण्यासाठी ते उत्सुक आहेत, असं विधान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नुकतंच केलं आहे. ट्रूथ आणि ट्विटर खात्यांवर त्यांनी हा नवीन विचार मांडला आहे. ‘माझे खूप चांगले मित्र नरेंद्र मोदी यांना येत्या काही आठवड्यात भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. दोन्ही देश महान आहेत. आणि त्यांच्यातील संबंध आणखी वृद्धिंगत होऊन व्यापारी कराराची बोलणीही पूर्ण होतील,’ असं ट्रंप यांनी ट्रूथ या सोशल मीडिया साईटवर लिहिलं आहे.(Indo – US Trade Deal)

(हेही वाचा – जर तुम्ही UPI द्वारे व्यव्हार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, १५ सप्टेंबरपासून नियम बदलणार)

अमेरिकेनं नुकतंच भारताविरुद्ध आयात शुल्क वाढवून ५० टक्क्यांवर आणलं आहे. आणि त्यानंतर ट्रंप यांनी भारताला मृत अर्थव्यवस्थाही म्हटलं होतं. पण, आता पुन्हा एकदा त्यांनी मोदींसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून ट्रंप यांची भाषा पुन्हा एकदा बदलली आहे. ‘मोदी आणि आपलं नातं अतिशय खास आहे. नरेंद्र मोदी आणि मी नेहमीच चांगले मित्र राहू. आणि दोघांमध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही,’ असं ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमध्ये हे वक्तव्य केलं होतं.(Indo – US Trade Deal)

(हेही वाचा – भारत-अमेरिका संबंध पुन्हा रुळावर; Donald Trump यांनी लिहीलेल्या पोस्टवर पंतप्रधान मोदींचे उत्तर काय?)

एएनआय वृत्तसंस्थेनं ट्रंप यांना भारत – अमेरिका संबंधांबद्दल विचारलं असता ट्रंप यांनी थेट उत्तर दिलं. ‘नरेंद्र मोदी चांगले आहेत. पण, सध्याच्या परिस्थितीत ते इतर देशांसारखेच वागत आहेत. ते मला नाही आवडत. पण, भारत आणि अमेरिकेचे संबंध मात्र आधीपासून चांगले आहेत. आणि ते तसेच राहतील,’ असं ट्रंप म्हणाले. नरेंद्र मोदी यांनीही ट्रंप यांच्या मैत्रीचा स्वीकार करणारं ट्विट केलं आहे. आणि व्यापारी कराराची बोलणी सुरू ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे. इतर देशांवर आयात शुल्क लादताना ट्रंप यांनी युरोपियन महासंघाचं उदाहरण दिलं आहे. महासंघातील देशही बाहेरच्या देशातून केलेल्या आयातीवर भरपूर शुल्क लावतात.(Indo – US Trade Deal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.