दक्षिण भारतातील Hoysala मंदिर का आहे जागतिक वारसा? पहा सुंदर छायाचित्रे

175

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ 2023 च्या यादीत कर्नाटकातील Hoysala समूहातील मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. होयसळ मंदिर भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आणि पूर्वजांच्या कुशलतेचा पुरावा असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

होयसाळेश्वर मंदिर कर्नाटकातील हसन जिल्ह्यात आहे. होयसळेश्वर मंदिर ते म्हैसूर विमानतळ हे अंतर अंदाजे 150 किमी आहे. हसन रेल्वे जंक्शन हे कर्नाटकसह दक्षिण भारतातील जवळपास सर्व प्रमुख शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे. हसन जंक्शन होयसलेश्वर मंदिरापासून फक्त 30 किमी अंतरावर आहे.

hoysala

होयसळेश्वराचे मंदिर उंच चबुतऱ्यावर बांधलेले असून या चबुतऱ्यावर 12 कोरीव थर आहेत. होयसाळ वास्तुकलेचे हे एक उत्तम उदाहरण आहे कारण या 12 थरांना जोडण्यासाठी चुना सिमेंट किंवा इतर कोणतीही सामग्री वापरली गेली नाही. येथील कोरीव काम थक्क करणारे आहे. एखाद्या मशीनच्या मदतीने देखील होणार इतके सुरेख कोरीवकाम येथे पहायला मिळते.

hoysala1

(हेही वाचा Women’s Reservation Bill : महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर; श्रेयवादावरून गदारोळ होऊन कामकाज तहकूब)

कर्नाटकातील Hoysala मंदिराची निर्मीती 1121 मध्ये करण्यात आली. या मंदिरातील शिल्पकलारविडीयन बांधकाम शैली आणि नागारा शैली या दोन्हीपेक्षा वेगळे आहे.

hoysala5

Hoysala राजांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 1,500 मंदिरे बांधली. कर्नाटक राज्यातील  होयसळ समूहातील मंदिरं राजा विष्णुवर्धनाच्या कारकिर्दीत बांधली गेली.

hoysala6

इसवी सन 10 व्या ते 14 व्या शतकादरम्यान  दक्षिण भारतीय Hoysala साम्राज्य हे अस्तित्वात होते. या होयसळ साम्राज्याने सध्याच्या कर्नाटक राज्याच्या बहुतांश भागांवर तसेच गोव्याच्या काही भागांत राज्य केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.