BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू

269
Delhi Assembly Election : दिल्लीतील राखीव मतदारसंघावर BJP चा फोकस

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात दोन विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. पहिल्या यादीत 13 महिला, सहा एसटी आणि चार एससी वर्गातील उमेदवारांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाकडून (BJP) विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तिकीट वाटप करण्यापूर्वी भाजपाने (BJP) आमदारांची स्थिती जाणून घेण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण केले होते. यामुळे जवळपास 30 टक्के आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा होती.

(हेही वाचा – Karwa Chauth Wishes : करवा चौथच्या दिवशी द्या आपल्या माय मराठीत शुभेच्छा!)

मात्र, भाजपाने (BJP) आज जाहीर केलेल्या यादीत बहुतांश आमदारांवर विश्वास दाखवित त्यांनाच मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासाठी विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना डच्चू देण्यात आला आहे. याशिवाय, चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी शकंर जगताप यांना तिकीट दिले आहे.

भाजपाच्या (BJP) यादीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेची छाया दिसून येते. पहिल्या यादीत भाजपाने 13 महिलांना तिकीट दिले आहे. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – BJP च्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहिर; वाचा संपूर्ण यादी)

भाजपा (BJP) जवळपास दीडशे जागा लढविणार असल्याची चर्चा आहे. यातील 99 जागांवरील उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. यात 13 महिलांचाही समावेश आहे. भाजपाने उमेदवारांची यादी सर्वात आधी जाहीर करून पहिला क्रमांक पटकाविला आहे.

महायुतीतील भाजपाची (BJP) यादी आल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीकडे लक्ष लागले आहे. भाजपाने उमेदवार जाहीर केले असले तरी महायुतीतील कोणता पक्ष किती जागा लढविणार आहे? हे अजूनही कळू शकले नाही. यामुळे शिवसेना आणि राकॉ किती जागांवर उमेदवार घोषित करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.