
Sushmita Mukherjee बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी यांनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबाबत प्रथमच स्पष्टपणे भाष्य केले आहे. शाहरुख खानसोबत King Uncle आणि इतर चित्रपटांमध्ये झळकलेल्या सुष्मिता यांनी सांगितले की, स्वतःच्या प्रॉडक्शन कंपनीला मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतर त्यांच्यावर सुमारे एक कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मनाविरुद्ध सी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम स्वीकारावे लागले, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. (Sushmita Mukherjee)
सुष्मिता मुखर्जी यांनी त्या काळातील परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले की, आर्थिक संकट इतके गंभीर होते की कुटुंब चालवणे आणि कर्जाची परतफेड करणे याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नव्हता. त्या म्हणाल्या, “असं वाटलं की मी माझा आत्माच विकला.” मात्र हा निर्णय त्यांनी कोणत्याही हौसेपोटी नव्हे, तर पूर्णपणे परिस्थितीमुळे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Sushmita Mukherjee)
(हेही वाचा – राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती सुरू; शालेय शिक्षण आयुक्त Sachindra Pratap Singh यांची माहिती)
अभिनेत्रीने सांगितले की, त्यांच्या निर्मिती संस्थेला दिवाळखोरीचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी घरातील आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. विशेषतः मुलीच्या परदेशातील शिक्षणासाठी मोठा खर्च आवश्यक होता. त्यामुळे उपलब्ध असलेले कोणतेही काम स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर आली. आर्थिक गरज हीच त्या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. (Sushmita Mukherjee)
या संपूर्ण अनुभवाकडे मागे वळून पाहताना सुष्मिता मुखर्जी म्हणाल्या की, त्या काळातील निर्णय कठीण होता, पण त्याबद्दल त्यांना आज पश्चात्ताप नाही. त्या परिस्थितीत आपल्या कुटुंबासाठी जे योग्य वाटले तेच त्यांनी केले. संघर्षाच्या त्या दिवसांनी त्यांना अधिक मजबूत बनवले आणि आज त्या केवळ दर्जेदार व आशयपूर्ण भूमिका स्वीकारण्यावर भर देतात. (Sushmita Mukherjee)
(हेही वाचा – Mumbai Local : धक्कादायक! पुरुष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण; व्हिडीओ तुफान व्हायरल)
सुष्मिता मुखर्जी यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. गोलमालसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले आहे. त्यांच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक कबुलीमुळे बॉलिवूडमधील कलाकारांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो आणि पडद्यामागील संघर्ष किती कठीण असू शकतो, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Sushmita Mukherjee)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
