Sleep : झोपेच्या समस्येमुळे आहात त्रस्त?; रात्री शांत झोप हवी असल्यास करा ‘हे’ उपाय

216

आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एक दिवस आपल्या झोपेवर विविध कारणांमुळे परिणाम होतो असतो. झोपेसोबत दैनंदिन जीवनात बदल केल्यामुळे झोप चांगली येते. परंतू झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या जीवनाच्या विविध पैलुंवर प्रभाव टाकते. पण, तज्ज्ञांच्या मते, एक चांगला आराम शरीराला भरपूर जास्त उत्पादनक्षम आणि जीवनात एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवतो. झोप आपल्या रोगप्रतिकार प्रणालीला वाढवते त्यासोबत मूड आणि चयापचय नियंत्रित करून दिवसभर तुमच्या भावना संतुलित करते. शांत झोप मनाला ताजे करते आणि दिर्घायुष्य बनवते.

झोप एका व्यक्तीच्या शरीरासाठी सगळ्या शक्तीशाली गोष्टींमधली एक गोष्ट आहे असे सांगणारे लेखक एरिक प्राथर जे एक मनोवैज्ञानिक आणि वैद्यकीय विज्ञान विभागातील प्राध्यापक आहेत, त्यांच्या द सेवन डे स्लिप प्रिस्किप्शन या पुस्तकात सुचित केले आहे की एक व्यक्ती चांगली आणि योग्य झोप प्राप्त करु शकते.

रात्रीच्या झोपेत तणाव, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि आजारपण इत्यादी गोष्टी अडथळा ठरु शकतात. तुमच्या झोपेवर परिणाम करणाऱ्या घटकांना थांबवू शकत नाहीत. तथापि, चांगल्या झोपेला प्रोत्साहीत करणाऱ्या सवयी तुम्ही अवलंबू शकता. या सोप्या टिपांसह प्रारंभ करा.

(हेही वाचा Wari Jihad : वारी जिहाद : वारकऱ्यांच्या तोंडून वदवले ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’, पंढरीच्या वारीत धर्मांतराचा प्रयत्न?)

झोपण्याची वेळ निश्चित करा

तज्ञ सल्ला देतात की रोज आपण ठरलेल्या वेळात झोपायला हवे. असे केल्यामुळे झोप चांगली येते. या नियमाला सुट्टीच्या वेळेतही पाळायला हवे. याचसोबत तुम्हाला ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमच्या झोपेचे आणि उठण्याचे एक वेळापत्रक तयार होईल. ज्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल.

झोपण्याच्या आधी अंघोळ करा

झोपण्याच्या आधी अंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्याच्या दिवसात अंघोळ करण्यास थोडे कठीण होईल पण कडक उन्हाळ्यात झोपण्याआधी साध्या पाण्याने अंघोळ करणे झोपेसाठी फायदेशी आहे. आंघोळ केल्यावर शरीराला थोडे ताजेतवाने वाटते. जर आंघोळ शक्य नसेल तर हातपाय धुवून झोपा.

योग्य उशी निवडा

रात्री चांगली झोप येण्यासाठी आपली उशी आरामदायी असणे महत्वाचे आहे. अशी उशी निवडा जी मऊ आणि आधार देणारी असेल. नॅशनल स्लीप फाउंडेशनने केलेल्या अभ्यासानुसार, आरामदायी उशीचा वापर केल्यास दहापैकी सात लोकांना लवकर झोप येते आणि चांगली झोप लागते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.