Wari Jihad : वारी जिहाद : वारकऱ्यांच्या तोंडून वदवले ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’, पंढरीच्या वारीत धर्मांतराचा प्रयत्न?

भोळ्याभाबड्या भक्ती सोहळ्याचा गैरफायदा घेण्याचा मुसलमानांचा प्रयत्न

320

सध्या मुसलमान येनकेन प्रकारेण धर्मांतरासाठी निरनिराळे मार्ग शोधत आहेत, ज्यातून लव्ह जिहाद, लँड जिहाद, थूक जिहाद, हलाल जिहाद सारखी प्रकरणे समोर आली आहेत. यातून पंढरपूरची वारीदेखील सुटली नाही. आता वारीतही मुसलमानांनी धर्मांतराचा प्रयत्न केला आहे.

वारी म्हटले की आपसूकच अवघा महाराष्ट्र भावस्थितीत जातो. मैलोन मैल अबालवृद्ध विठुरायाचा गजर करत पंढरीच्या दिशेने पायी मार्गक्रमण करत असतात. शेकडो वर्षांची ही परंपरा अजूनही सुरु आहे. लाखो वारकरी या वारीत सहभागी होतातच, त्यासोबतच जे या वारीत सहभागी होत नाहीत, तेही आषाढात जेथे आहेत तिथे विठूरायाची नमन-चिंतन करत असतात, अशा या भोळ्याभाबड्या भक्ती सोहळ्याचा गैरफायदा घेण्याचा मुसलमान प्रयत्न करू लागले आहेत. याचा धक्कादायक पुरावा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे.

(हेही वाचा Love Jihad : बंदुकीचा धाक दाखवून १३ वर्षीय हिंदू मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न; दोन तरुणांना अटक)

वारीत एका ठिकाणी एक धर्मांध मुसलमान वयस्क व्यक्ती वारकऱ्यांमध्ये येतो आणि त्यांना विठू नामाचा गजर करण्याऐवजी अल्लाचा गजर करण्यासाठी त्यांचा बुद्धिभेद करतो. त्यासाठी तो अभंगासारखी रचना करतो, त्याला अभंगासारखी चाल देतो आणि भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना त्याच्या पाठोपाठ अल्लाचा गजर करण्यास सांगतो. हा धर्मांध मुसलमान माणूस वारकरी म्हणतो, ज्यावेळी तुकाराम महाराज यांची पालखी निघाली होती, तेव्हा तुकाराम महाराज यांनी अभंग म्हटला होता त्यात ते म्हणाले होते, ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे…’. दुर्दैव म्हणजे ते वारकरीही त्या मुसलमानांच्या बोलण्याला भुलतात आणि ज्या टाळा-मृदूंगाच्या नादात ‘ग्यानबा तुकाराम’, असा नामगजर केला जातो, त्या टाळा-मृदूंगाच्या नादात चक्क ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे, अल्ला खिलावे, अल्ला पिलावे, अल्ला बिगर ना कोई, अल्ला दारुल दाता, अल्ला बिगर ना कोई, अल्ला करे सो होई, हे गरीब नवाज’, असे वारकरी त्या मुसलमानांच्या तालात बोलताना दिसत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.