Love Jihad : बंदुकीचा धाक दाखवून १३ वर्षीय हिंदू मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न; दोन तरुणांना अटक

123
गेल्या काही दिवसांत देशात लव्ह जिहादचे प्रकरणे वाढलेली आहेत. नुकतेच पुणे जिल्ह्यातील मंचरमधून कथित लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले होते. ही घटना ताजी असताना एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी नकली बंदुकीने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात दोन जणांवर कलम 354, 354 (अ) 506 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

बुरखा घालून तयार राहण्यास सांगितले

पीडित मुलगी 13 वर्षांची असून भाईंदरला राहते. मुनव्वर मन्सुरी याने 12 जूनला रात्री साडेआठच्या सुमारास मुलीला इमारतीच्या टॅरेसवर नेऊन बुरखा, चैन आणि अंगठी देत बुरखा घालून तयार राहण्यास सांगितले. बुरखा घालून ये आपण पळून जाऊन लग्न करू असे त्या मुलीला सांगितले होते. मात्र, पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वर याने पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबुल केला नाहीस तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर भाईंदर पोलीसांनी मुन्नवर अन्सारी (वय 20) आणि अजीम मन्सुरी (वय 18) या दोघांना विनयभंगाच्या कलम 354, 354 (अ) 506 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.